औरंगाबाद: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबादमध्ये उद्यापासून सुरू होणारा लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबद्दलची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांसोबत पत्रकार परिषद घेत लॉकडाऊन रद्द करत असल्याची घोषणा केली. (Lockdown in Aurangabad cancelled by District administration)आधी रोजगाराचे पैसे थेट खात्यावर जमा करा, मग लॉकडाऊनचं बघा; पृथ्वीराज चव्हाणांचा ठाकरे सरकारला सल्लाआधी औरंगाबादमध्ये ३० मार्च ते ८ एप्रिल दरम्यान लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर त्यात काहीसा बदल करून ३१ मार्च ते ९ एप्रिल दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. उद्यापासून लॉकडाऊन सुरू होणार असल्यानं गेल्या २ दिवसांपासून बाजारात खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती. मात्र आज जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांसह पत्रकार परिषद घेत लॉकडाऊन रद्द केल्याची घोषणा केली.
दोन दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत १२ हजारांची घट; राज्यासाठी 'पॉझिटिव्ह' बातमी
लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे लॉकडाऊन रद्द?औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर या निर्णयाला विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मोठा विरोध केला होता. AIMIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. भाजप आणि मनसेच्या नेत्यांनीही लॉकडाऊनच्या विरोधात भूमिका घेतली. औरंगाबाज जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयाविरोधात इम्तियाज जलील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. ३१ मार्चला लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा जलील यांनी केली होती.