औरंगाबाद : शहर आणि वाळूज औद्योगिक परिसरात १० ते १८ जुलैदरम्यान लागू होणाऱ्या लॉकडाऊनदरम्यान उद्योग सुरू ठेवण्यासाठी सशर्त परवानगी असल्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी सांगितले. शासनाचे उद्योगाबाबतचे धोरण आहे, त्याला अनुसरून पालकमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीत लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसंदर्भात सूचना देताना देसाई यांनी उद्योग क्षेत्र सशर्त सुरू ठेवण्याबाबत सूचना दिल्या.
औद्योगिक संघटनांकडून आभारउद्योगांसाठी थोडीफार का होईना सवलत दिल्याबद्दल सर्व औद्योगिक संघटनांचे मानसिंग पवार, कमलेश धूत, अभय हंचनाळ, मुकुंद कुलकर्णी यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. चिकलठाणा, वाळूज, रेल्वेस्टेशन, एमआयडीसी व औरंगाबाद शहराव्यतिरिक्त इतर एमआयडीसी किंवा खासगी जागेवरील उद्योग चालू राहणार असल्यामुळे त्यांना आवश्यक ते पास देऊन कामगारांची वाहतूक निश्चित बसने करता येईल. जे उद्योग कामगारांची दहा दिवस कंपनीमध्ये निवास व्यवस्था करणार, त्यांना उद्योग सुरू ठेवण्यास कोणतीही अडचण नाही.दरम्यान शेतमाल, कृषी निगडित प्रक्रिया उद्योग नियमानुसार चालू राहतील, असे मनपा आयुक्तांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे.
एमआयडीसी पोर्टलच्या परवानग्या ग्राह्यजिल्ह्यात औषध व अन्न उत्पादन, सलग प्रक्रिया आणि निर्यात उद्योग व त्यांचे पुरवठादार चालू राहणार व यासाठी एमआयडीसी पोर्टलवरून यापूर्वी देण्यात आलेल्या परवानग्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत, तसेच औरंगाबाद शहरामधून उद्योग क्षेत्रामध्ये आणि परतीसाठी फक्त कार किंवा निश्चित बसमधूनच प्रवासाला परवानगी राहील.चिकलठाणा, वाळूज, रेल्वेस्टेशन एमआयडीसी व औरंगाबाद शहराव्यतिरिक्त इतर एमआयडीसी किंवा खाजगी जागेवरील उद्योग चालू राहणार आहेत. जे उद्योग समूह कामगारांची १० दिवस कंपनीत निवास व्यवस्था करणार आहेत, त्यांना उद्योग चालू ठेवण्यास कोणतीही अडचण येणार नाही, तसेच शेतमालाशी निगडित प्रक्रिया उद्योगही चालू राहणार. औद्योगिक क्षेत्रानजीकच्या खेड्यांमधील कामगारांची वाहतूक कार किंवा बसने सुरू राहणार आहे. आरोग्याबरोबरच अर्थचक्र चालू राहणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री देसाई यांनी केले आहे.