शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

lockdown In Aurangabad : सावरणारी घडी पुन्हा विस्कटली; लहान व छोट्या व्यावसायिकांची व्यथा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 6:39 PM

जे काही थोडेफार पैसे मिळायचे त्यातून कसा तरी घरगाडा चालयाचा; पण आता पुन्हा सर्वकाही ठप्प झाले आहे. 

ठळक मुद्देलहान व्यावसायिक झाले त्रस्त छोट्या व्यावसायिकांची उपासमार 

औरंगाबाद : लॉकडाऊनचे दोन- अडीच महिने संपले आणि पुन्हा एकदा सर्वांनी नवी सुरुवात केली; पण कोरोनाचा कहर वाढत गेला आणि पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे आमच्या व्यवसायाची सावरू पाहणारी घडी पुन्हा विस्कटली, अशी व्यथा छोट्या व्यावसायिकांनी व्यक्त केली. रिक्षा, गॅरेज, इस्त्रीवाले, मेसचालक, स्टेशनरी, घरकाम करणाऱ्या महिला, बांधकाम मजूर यांचे काम लॉकडाऊनच्या मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा सुरू झाले होते. जे काही थोडेफार पैसे मिळायचे त्यातून कसा तरी घरगाडा चालयाचा; पण आता पुन्हा सर्वकाही ठप्प झाले आहे. 

हप्ते थकले, उत्पन्न थांबलेरिक्षा सुरू झाली तर थोडेसे हायसे वाटले होते. दिवसाला फार काही ग्राहक होत नव्हते. तरी पण जे काही पैसे दिवसाकाठी मिळायचे त्याने दोन-चार दिवसांच्या भाजीपाल्याचा खर्च तरी नक्कीच भागायचा. रिक्षाचे कर्ज डोक्यावर आहे. हप्ते थकल्याने आता बँकेवाले मागे लागले आहेत. व्याज वाढत आहे. घरभाडेही देता  येत नाही. मग आता करावे काय, असा प्रश्न पडला आहे. - पवन दाभाडे, रिक्षाचालक

आठ दिवसांपेक्षा जास्त नकोअडीच महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे आधीच व्यवसायाचे खूप नुकसान झाले आहे. अनेकांना दुकानाचे  भाडे भरणे कठीण झाल्याने त्यांनी सलूनचे सगळे सामान घरातच आणून ठेवले आहे. कुटुंबाचा खर्च भागविणे दिवसेंदिवस जड जात असताना पुन्हा लॉकडाऊन लागले आणि सगळे शांत झाले. आता मात्र आठ दिवसांपेक्षा अधिक दिवस लॉकडाऊन नको.- सुशील बोर्डे, सलून व्यावसायिक

व्यवसायाला उभारी मिळणार कशी ?लॉकडाऊनदरम्यान तर लॉण्ड्रीचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. अनलॉक काळात व्यवसायाला  थोडीफार उभारी मिळेल, अशी आशा होती; पण तेव्हा १० टक्केही व्यवसाय झाला नाही. काळानुसार बदल केला आणि होम डिलिव्हरीची सेवा सुरू केली. तरी नेहमीच्या ग्राहकांकडूनही व्यवसाय येत नाही. वारंवार लॉकडाऊनचे चक्र चालू राहिले तर व्यवसायाला उभारी मिळणार तरी कशी.- रोहित लिंगायत, इस्त्री व्यावसायिक 

टॅग्स :bankबँकcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय