शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

लाॅकडाऊन वर्षपूर्ती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:04 AM

लाॅकडाऊन वर्षपूर्ती : भयंकर अशा शुकशुकाटाचे ‘ते’ दिवस, उद्योग, व्यवसायांवर परिणाम, ‘वर्क फ्राॅम हाेम’, ऑनलाइन शिक्षणाची नवी सुरुवातही औरंगाबाद ...

लाॅकडाऊन वर्षपूर्ती : भयंकर अशा शुकशुकाटाचे ‘ते’ दिवस, उद्योग, व्यवसायांवर परिणाम, ‘वर्क फ्राॅम हाेम’, ऑनलाइन शिक्षणाची नवी सुरुवातही

औरंगाबाद : दिवसा उजेडी भयंकर असा शुकशुकाट... सुरुवातीचे काही दिवस घराघरांत आनंदाचे अन् नंतर चिंतेचे भंडार...उद्योग, व्यवसाय ठप्प, बेरोजगारीचे संकट, उदरनिर्वाहाचा प्रश्न... पण सोबतच कोरोनाला हरविण्याची जिद्द, एकमेकांना मदतीचा हात...‘वर्क फ्राॅम हाेम’, ऑनलाइन शिक्षण अशी नवी सुरुवात...एक ना अनेक अशा चांगल्या, वाईट गोष्टींचा अनुभव आणि त्यातून सावरण्याचा धडा लाॅकडाऊनने औरंगाबादकरांना शिकविला. २२ मार्च २०२० रोजी जनता कर्फ्यू आणि त्याच्या दुसर्याच दिवशी २३ मार्चपासून सुरू झालेल्या लाॅकडाऊनने औरंगाबादकरांच्या स्मृतीत कायमचे घर केले. या काळात ‘न भूतो न भविष्यती’ अशी कोरोना बंदी म्हणजेच लाॅकडाऊन सर्वसामान्यांनी अनुभवली.

जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना महामारीने देशात, राज्यात आणि औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश केला आणि त्यानंतर सर्वसामान्यांना लाॅकडाऊनला सामोरे जावे लागले. आजपर्यंत कधीही पाहिला नसेल असा बंद म्हणा, संचारबंदी म्हणा की, कर्फ्यू, या लाॅकडाऊनच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अनेक क्षेत्रांवर त्याचा परिणाम झाला. काहींवर क्षणिक , तर काहींवर दूरगामी परिणाम झाला. परंतु सगळ्यांतून सावरत कोरोनाशी दोन हात करत औरंगाबादकरांनी पुढे पाऊल टाकणे सुरू केले. ‘मिशन बिगिन अगेन’ने जनजीवन सुरळीत झाले. परंतु कोरोनाच्या संकटाने पुन्हा डोके वर काढले. परिणामी, आता पुन्हा एकदा अंशत: लाॅकडाऊनला सामोरे जाण्याची वेळ ओढावली.

-----

१)कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चला जनता कर्फ्यू पाळण्यात आला. या दिवशी कोरोनाच्या अरिष्टाला हद्दपार करण्यासाठी औरंगाबादकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. टाळ्या, थाळ्यांसह शंखनाद करत डाॅक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यंत्रणेप्रती नागरिकांनी सद्भावना व्यक्त केली.

२)जनता कर्फ्यूच्या उत्स्त्फूर्त प्रतिसादानंतर केंद्र आणि राज्य सरकारने २२ मार्च रोजी मध्यरात्रीपासून (२३ मार्च २०२०)कडक निर्बंध आणि अधिक व्यापक उपाययोजना जाहीर केल्या. संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

२)कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २३ मार्च रोजी पहाटे ५ वाजेपासून शहरासह जिल्ह्यात तत्कालिन जिल्हाधिकारी उदय चौधरी, तत्कालिन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले.

३)संचारबंदीची घोषणा होताच विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची रस्त्यावर एकच गर्दी उसळली. २३ मार्चला रात्री ९ वाजल्यानंतर मात्र, रस्ते निर्मनुष्य झाले. ही स्थिती पुढील अनेक दिवस जिल्ह्यात पाहायला मिळाली. शहरात ‘न भूतो, न भविष्यती ’ अशी भयाण शांतता अनुभवास आली.

४)लाॅकडाऊनचा दुसरा टप्पा १५ एप्रिलपासून सुरू झाला. ज्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोना साथीचा प्रसार जास्त प्रमाणात झाला आहे, अशा ठिकाणांहून प्रवास करून येणाऱ्यांना औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी बंधनकारक करण्यात आली.

५)जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्र, मोठे उद्योग, कारखानेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. वाळूज उद्योगनरीतील ४ हजार लहान-मोठे कारखाने बंद ठेवण्यात आला. त्याचा उद्योगासह कामगारांना मोठा आर्थिक फटका बसला.

६)लाॅकडाऊनमुळे ‘वर्क फ्राॅम हाेम’ ही नवी संकल्पना पुढे आली. अनेक उद्योग, व्यवसाय, कार्यालयीन कामकास ‘वर्क फ्राॅम हाेम’ने सुरळीत ठेवण्यात आले. वर्षभरानंतर अनेक उद्योग, व्यवसाय याच पद्धतीने कामकाज सुरू ठेवत आहे.

७)कोरोनाशी दोन हात करण्यासाठी लाॅकडाऊन पाळताना अनेकांना बेरोजगारी, आर्थिक संकटला सामोरे जावे लागले. रिक्षाचालकांपासून मोलमजुरी करणारे मजूर, कामगारांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले. पण अशांसाठी सामाजिक संस्थांसह औरंगाबादकरांनी मदतीचा हात पुढे केला.

८)लाॅकडाऊनमुळे उपासमारीच्या भीतीने उद्योगनगरीत आलेल्या मजुरांनी गावी परतणे सुरू केले. मिळेल तिथंपर्यंत वाहनाने, पायी प्रवास करून कुटुंबासह मजुरांनी स्थलांतर सुरू केले.

९)मृत्यूचे तांडव काय असते, हे औरंगाबादसह संपूर्ण देशाने ८ मे २०२० अनुभवले. मध्यप्रदेशकडे रेल्वे रूळावरून पायीच निघालेल्या १६ मजुरांना मालगाडीने चिरडल्याची दुर्दैवी घटना सटाणा (ता. जि. औरंगाबाद) गावाजवळ घडली. या घटनेनंतर मजुरांना गावी जाण्यासाठी श्रमिक रेल्वे साेडण्यात आल्या.

१०) राज्य शासनाने १ जून २०२० रोजी लाॅकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने सूट दिली. ‘मिशन बिगिन अगेन’ सुरू करून विविध सेवा सुरळीत करण्यात आल्या. शहरवासीयांचे जीवन सुरळीत झाले. मात्र, लाॅकडाऊनच्या वर्षपूर्तीच्या तोंडावर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने जिल्हा पुन्हा एकदा अंशत: लाॅकडाऊनवर आला.