अंबाजोगाई: येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणातील गैरहजेरी परिणामी नागरिकांची होणारी हेळसांड या घटनेच्या निषेधार्थ संतप्त कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी प्रादेशिक परिवहन कार्यालयास कुलूप ठोकले. पोलिसांनी हस्तक्षेप करून तासाभरानंतर कामकाज सुरू केले. अंबाजोगाई येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून परिवहन अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. तसेच इतरही कार्यालयातील पदे रिक्त आहेत. जे कर्मचारी सेवेत आहेत. तेही अंबाजोगाईत न येता लातूरवरूनच कामकाज पाहतात. परिणामी अंबाजोगाई विभागातील परळी, केज, माजलगाव, धारूर व परिसरातील नागरिकांची व वाहनधारकांची मोठी गैरसोय होते. वारंवार या संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कामकाजात सुसूत्रता न आल्याने अ. भा. मराठा व महासंघ व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दुपारी कार्यालयास कुलूप ठोकले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून विस्कळीत झालेले कामकाज सुरू केले. या घटनेचा पंचनामा महसूल प्रशासनाने केला आहे. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला. (प्रतिनिधी)
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास ठोकले कुलूप
By admin | Published: June 12, 2014 11:32 PM