शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

निवासस्थानांना कुलूप ठोकून अनधिकृत रहिवाशांनी काढला पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 10:48 PM

घाटी रुग्णालयातील निवासस्थानांतील अनधिकृत रहिवाशांवर कारवाईसाठी महिनाभरानंतर पुन्हा हालचाल सुरू झाली आहे. निवासस्थान वाटप समितीने बुधवारी निवासस्थानांची पाहणी केली.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील निवासस्थानांतील अनधिकृत रहिवाशांवर कारवाईसाठी महिनाभरानंतर पुन्हा हालचाल सुरू झाली आहे. निवासस्थान वाटप समितीने बुधवारी निवासस्थानांची पाहणी केली. यावेळी अनेक निवासस्थानांना कुलूप आढळले. त्यामुळे समितीच्या पाहणीची चाहूल लागल्याने निवासस्थानांना कुलूप ठोकून अनधिकृत रहिवाशांनी पळ काढला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. घाटी रुग्णालयातील निवासस्थानांतील गैरप्रकार ‘लोकमत’ने १० मार्च रोजी ‘शासकीय क्वॉर्टर्सवर अनधिकृत ताबा’ हे वृत्त प्रकाशित करून समोर आणला; परंतु निवासस्थानांत अनधिकृत रहिवाशांवरील कारवाईला मुहूर्तच मिळत नसल्याचे दिसत आहे. अनधिकृत रहिवाशांवरील कारवाईसाठी समितीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या महिनाभरात कारवाईसाठी कोणतीच हालचाल झाली नाही. अखेर समितीने पुन्हा एकदा कारवाईची तयारी केली आहे. समितीचे अध्यक्ष उपअधिष्ठाता तथा शरीररचनाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. अनिल धुळे, डॉ. जे.बी. भाकरे, प्रशासकीय अधिकारी एस.एस. जाधव आदींनी बुधवारी जवळपास वर्ग-१ ते ४ च्या कर्मचारी, डॉक्टरांच्या जवळपास ९० निवासस्थानांची पाहणी केली. यावेळी अनेक निवासस्थानांना कुलूप लावलेले आढळले. त्यामुळे अनेकांनी कारवाईच्या भीतीने पळ काढल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या निवासस्थानांना लवकरच नोटीस लावण्यात येऊन पुढील कारवाई केली जाणार आहे.नोटीस देणारनिवासस्थानांतील अनधिकृत रहिवाशांना नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे. पोलिसांच्या उपस्थितीत होणाºया पाहणीत कुलूप आढळले तरीही कारवाई के ली जाईल. घरातील साहित्य जप्त करून पंचनाम केला जाईल, अशी माहिती डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.