लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पाथरी तालुक्यातील बाभळगाव आणि हादगाव महसूल मंडळात सर्वात कमी पाऊस झाला असून, या मंडळासाठी जायकवाडी प्रकल्पातून कालव्याद्वारे पाणी सोडावे, असे पत्र जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले आहे़जायकवाडी प्रकल्पात सध्या ८४ टक्के पाणीसाठा असून, पाण्याची आवक सुरू आहे़ जिल्ह्यात पाथरी तालुक्यातील बाभळगाव मंडळात ३९ टक्के तर हादगाव मंडळात केवळ ३५ टक्के पाऊस झाला आहे़ त्यामुळे या मंडळांमध्ये चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो़ यावर उपाय करण्यासाठी जायकवाडी प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात न सोडता पैठण डाव्या कालव्यात सोडावे, असेही या पत्रात जिल्हाधिकाºयांनी म्हटले आहे़
दोन मंडळांसाठी मागविले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:37 AM