शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

मराठवाड्यात टोळधाड दाखल; शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 6:27 PM

खानदेशच्या सीमेवर असलेल्या सोयगाव तालुक्यात टोळधाड दाखल झाल्याचे शनिवारी उघडकीस आल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सोयगाव : कोविड-१९ च्या संसर्गानंतर शेतकऱ्यांवर नवीन संकट ओढवले असून मध्यप्रदेशात थैमान घातल्याने टोळधाड मराठवाड्यात दाखल झाली आहे. खानदेशच्या सीमेवर असलेल्या सोयगाव तालुक्यात टोळधाड दाखल झाल्याचे शनिवारी उघडकीस आल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. खरीप हंगामाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असतांना शेतकऱ्यांची पेरणी आधीच चिंता वाढली आहे.

सोयगाव तालुक्याचा भाग चारही बाजूंनी डोंगराने वेढला असून मध्यप्रदेशातून या डोंगराळ भागात शुक्रवारी रात्रीपासून अचानक टोळधाड दाखल झाले आहे.खरिपाच्या पेरण्या आधीच सोयगाव तालुक्यात उन्हाळी पेरण्यांची धांदल सुरु झालेली असून त्यातच ऐन पेरण्यांच्या काळात काही भागात टोळधाड दाखल झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरिपाच्या पेरण्यांसाठी सोयगाव तालुक्यात पेरणीपूर्व मशागतीचे कामे आटोपले आहे. त्याआधीच काही भागात उन्हाळी पेरण्याची धांदल उडालेली असतांना अचानक टोळधाडच्या आगमनाने मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. टोळधाडच्या प्रमाणात अचानक वाढ झालेली असून गावातही टोळधाडचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे सायंकाळपासूनच घरांचे दरवाजे बंद करावी लागतात.

भाजीपाला क्षेत्रावर आक्रमण तालुक्यात अनेक भागात शेततळ्यांचे पाणी असल्याने ठिबक सिंचनवर भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले आहे. यावर आक्रमण करून टोळधाडने संपूर्ण क्षेत्र नष्ट केले आहे. तसेच खरिपाच्या उजाड शेतातही टोळधाडने अड्डा बनविला आहे. त्यामुळे या भागात पेरण्या करण्याची स्थिती बिकट झाली आहे.

कृषी विभागाकडून जनजागृती याबाबत उपाययोजनांच्या सूचना कृषी विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार खरिप हंगामाच्या पेरण्याआधीच टोळधाड बाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी अरविंद टाकणखार यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद