औरंगाबाद : लोकसभा २०१९ सार्वत्रिक निवडणुकीसाठी मराठवाड्यात १ कोटी ५६ लाख ६० हजार मतदार आठ खासदार संसदेत पाठविणार आहेत. यामध्ये ८२ लाख २९ हजार पुरुष, तर ७४ लाख २० हजार स्त्री मतदारांचा समावेश आहे. पुरवणी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर या मतदारसंख्येत आणखी वाढ होणार आहे.
नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक २५ लाख ४ हजार ६२४ मतदार असून, यामध्ये १२ लाख ९९ हजार ६५२ पुरुष, तर १२ लाख २ हजार ५२२ स्त्रियांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी १७ लाख १६ हजार ७४७ मतदार आहेत. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये १४७ तृतीयपंथी मतदार असून, सर्वाधिक ७० मतदार नांदेड जिल्ह्यात आहेत, विभागातील औरंगाबाद, परभणी, जालना, नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील सैन्यदलातील मतदारांची संख्या १० हजार ८४ आहे, तर ११ हजारांच्या आसपास पोस्टल मतदारांची संख्या आहे.
जिल्हानिहाय मतदार जिल्हा स्त्री - पुरुष - तृतीयपंथी एकूण नांदेड १२,२,५२२ १२, ९९,६५२ ७० २५,४,६२४औरंगाबाद ८८, ८२७ ९,७८,८०० १८ १८, ४५,०६६ जालना ८,६५,३७६ ९,७७,७४९ ६ १८,४५,०६६ परभणी ९,४४,१८१ १०,२६,७६५ ८ १९,७२,१९१ उस्मानाबाद ८,७७,७३२ ९,९३,६२७ २२ १८,७४,६२३ लातूर ९,७८,५४३ ९,८१,४९८ ४ १८,६०,०४५ बीड ९,५४,८०७ १०,७३,५२५ ७ २०,२८,३३९ हिंगोली ८,१८,७९१ 8,९७,९४४ १२ १७,१६,७४७