औरंगाबाद लोकसभेसाठी मतदानाचा टक्का पाहिजे तसा वाढलाच नाहीशहरी भागातील पूर्व मतदारसंघात, तर ग्रामीणमध्ये वैजापूरमध्ये टक्का घसरला- विकास राऊतऔरंगाबाद : २०१४ सालच्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का पाहिजे तसा वाढलाच नाही. २३ एप्रिल रोजी निवडणुकीसाठी ६३.४१ टक्के मतदान झाले. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत ६१.८५ टक्के मतदान झाले होते. यावेळी केवळ १.५६ टक्क्यांनी मतदान वाढले. २०१४ साली १५ लाख ३७ हजार ७०८ मतदार होते. २०१९ साली १८ लाख ८६ हजार २९४ मतदार झाले. ३ लाख ४८ हजार ५८६ मतदार वाढले; परंतु त्या तुलनेत मतदान वाढले नाही. २०१४ साली ९ लाख ७६ हजार ११० मतदान झाले होते. या निवडणुकीत ११ लाख ९५ हजार २४२ मतदान झाले. २ लाख १९ हजार १३२ मतदान या निवडणुकीत जास्त झाले. ६ लाख ५८ हजार १६७ पुरुष, तर ५ लाख ३७ हजार ७० महिला मतदारांनी मतदान केले. ग्रामीण भागातील कन्नड, गंगापूर विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला, तर वैजापूरमध्ये घसरला. शहरी भागात पूर्व मतदारसंघात मतदान कमी झाले. २०१९ सालच्या लोकसभेसाठी २३ एप्रिल रोजी झालेले मतदान मतदारसंघ झालेले मतदान आकड्यात कन्नड ६४.८० टक्के २ लाख २ हजार २३औरंगाबाद मध्य ६२.१९ टक्के १ लाख ९८ हजार ७८५औरंगाबाद पश्चिम ६२.७८ टक्के २ लाख ७ हजार ८२९औरंगाबाद पूर्व ६२.८० टक्के १ लाख ९२ हजार १९९गंगापूर ६५.८९ टक्के २ लाख ३ हजार ६२४वैजापूर ६२.०७ टक्के १ लाख ९० हजार ७८२एकूण ६३.४१ टक्के ११ लाख ९५६ हजार २४२
ग्रामीण भागात मतदान वाढलेकन्नड, गंगापूर आणि वैजापूर या तिन्ही ग्रामीण आणि निमशहरी मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढले आहे.
कन्नड २0१४ - १,७१,६२१२0१९ - २,0२,0२३
गंगापूर २0१४ - १,६०,४०९२0१९ - २,0३,६२४
वैजापूर२0१४ - १,५६,२००२0१९ - १,९०,७८२
औरंगाबाद मध्य२0१४ - १,६३,५४३२0१९ - १,९८,७८५
औरंगाबाद पश्चिम२0१४ - १,६९,0८५२0१९ - २,0७,८२९
औरंगाबाद पूर्व२0१४ - १,५५२५२२0१९ - १,९२,१९९