Manoj Jarange Patil ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांची सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज महाविकास आघाडीला धक्का दिला. स्वबळावर लढण्याची घोषणा करत पहिली यादी जाहीर केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाचे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लोकसभेबाबत चर्चा झाल्याचे आंबेडकर यांनी सांगितलं. याबाबत आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Prakash Ambedkar मोठी बातमी: प्रकाश आंबेडकरांचा मविआला धक्का; पहिली उमेदवार यादी जाहीर
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काल काय चर्चा झाली, यावर आज मनोज जरांगे पाटील माहिती दिली. "प्रकाश आंबेडकर यांनी काय भूमिका मांडली हे मी पाहिलेलं नाही. आमची भूमिका ३० तारखेला जाहीर होणार आहे. आमच्या बैठकीत निवडणूक लढवायचे हे पक्क आहे, आता आम्ही गावागावातील मराठा लोकांचे मत मागवले आहे. यावर आता आमचं पुढचं ठरणार आहे. आमच्या कालच्या भेटीत राजकीयही चर्चा झाली. ३० तारखेपर्यंत आमचे कोणतेही मत नाही. ३० तारखेला जो निरोप तेव्हा आम्ही जाहीर करणार, आता आम्ही पाठिंबा आणि उमेदवारीचीही घोषणा केलेली नाही, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
"आमच्यात काल समोरासमोर चर्चा झाली आहे. अजूनही आम्ही पाठिंबा दिलेला नाही. आमच्या समाजासोबत चर्चा करुन निर्णय घेणार आहे. राजकारणात बहुमताला किंमत आहे, जर मराठा समाजाचा होकार आला तर राजकारणात मोठ्या घडामोडी घडतील, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
३० तारखेला जाहीर करणार
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही सर्व जाती एकत्र आलो तर मोठी उलथापालथ होईल. मराठा समाजाची मत ग्राह्य धरली जात होती, हे आमचेच आहेत असं म्हणत होते. पण यांना निवडून देऊनही आरक्षण देत नाहीत. आता बैठका, रॅली काढली तरीही गुन्हे दाखल करत आहेत. गृहमंत्र्यांनी आता असं काही करु नये. या दहा वर्षात मराठा समाजात भाजपकडे सरकला आहे, मोठं मोठे नेते भाजपकडे आहेत. आम्ही कुणालाच मदत करणार नाही, आपण आपले बघू, असंही जरांगे पाटील म्हणाले.
"मी एकदा शब्द दिला की दिला, पण ३० तारखेपर्यंत मराठ्यांची भूमिका स्पष्ट भूमिका झाल्याशिवाय ना कोणता उमेदवार आम्ही निवडला आहे. ना कोणाला पाठिंबा दिला ३० तारखेनंतर सगळं क्लिअर होईल. आम्हीही ठरवलं आहे, म्हणूनच मी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितलं होतं मला राजकारणात हलक्यात घेऊ नका, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.