Manoj Jarange Patil ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील निवडणुका उद्या २० मे रोजी होणार आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघ पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. महायुतीने शेवटपर्यंत आपला उमेदवार जाहीर केला नव्हता. दरम्यान, या मतदारसंघात शिवसेनेने हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील कोणाला पाठिंबा देणार याबाबत चर्चा सुरू आहेत. याबाबत स्वत: जरांगे पाटील यांनी माहिती दिली आहे.
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस
"मी महायुती, महाविकास आघाडी, अपक्ष कोणालाच पाठिंबा दिलेला नाही. कोणाला निवडून आणायचं हे समाजाने ठरवायचं आहे. ही आता निवडणुका आहेत म्हणून आपल्याकडे येतात आणि पुन्हा गुरगुर करतात. आपली मुल डोळ्यासमोर ठेऊन मतदान करा, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. मी जातीवाद केलेला नाही. त्यांनीचआम्हाला हिणवलं आहे, असा आरोप पंकजा मुंडे यांच्यावर जरांगे पाटील यांनी केला. आजपासून एक महिना शांत रहा, कोण काय करत आहे यावर लक्ष ठेवा, असा सल्लाही मराठा समाजाला दिला.
२८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राजकारण माझा मार्ग नाही. मराठा एकत्र आल्याने तुमची लोकसभेला फजिती झाली, हे संकेत आहेत. माझ्या नादी लागू नका. सगेसोयरे अंमलबजावणी आणि मराठा कुणबी एकच ही मागणी मान्य करा एवढीच माझं म्हणणं आहे. माझा राजकारणाशी काही संबंध नाही. मला माझ्या समाजातील पोरं मोठी करायची आहे. समाजाला ताकद द्यायची आहे. जर तुम्ही हे नाही केले तर २८८ जागांवर मी सर्व जातीचे उमेदवार उतरून गोरगरिबांना निवडून आणणार. सर्व जातीधर्माचे लोक घेणार मग मी मागे हटणार नाही. त्यावेळी नाव घेऊन कुणाला पाडायचे हे सांगेन असा इशारा सत्ताधाऱ्यांना दिला.