छत्रपती संभाजीनगर : ४ जून रोजी होणाऱ्या औरंगाबाद लोकसभेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. १२ तासांच्या मतमोजणीअंती खासदार ठरणार आहे. १२ लाख ९९ हजार ४० मतदारांनी कुणाला कौल दिला आहे, यासाठी २७ फेऱ्याअंती मतमोजणी करून निकाल लागणार आहे. ४८ हजार ११२ मते प्रत्येक फेरीत मोजली जाणार आहेत. एका फेरीच्या मतमोजणीसाठी २० मिनिटे लागणार आहेत. ९ तास फेऱ्यांसाठी जाणार आहेत. ईव्हीएम स्ट्राँग रुममधून आणून ३७ उमेदवार व नोटा मिळून ३८ वेळा बॅलेट युनिटीचा बझर वाजण्याची प्रक्रिया होण्यासाठी वेळ जाणार आहे. बीड बायपास परिसरातील एमआयटी कॉलेजच्या आवारातील एका इमारतीत मतमोजणी होईल.
मतमोजणीच्या दिवशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना सकाळी ६:०० वा. रूजू व्हावे लागेल. सकाळी ७:०० वाजता गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर ८:०० वाजता पोस्टल मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर ८:३० वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल. १३ फेऱ्यांच्या ६ लाख ८१ हजार १२० म्हणजेच जवळपास ५० टक्के मतांची मोजणी होईल. या पहिल्या १३ फेऱ्यांमध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला आहे, याचा अंदाज येईल.
मतमोजणी प्रतिनिधी कसे येणार ?उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात चैतन्य टेक्नो स्कूल येथून केंद्रात येण्यासाठी सकाळी ७:०० वाजेपर्यंत यावे लागेल. निवडणूक संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार, इतर माध्यम प्रतिनिधींना एमआयटी कॉलेजच्या फूड टेक्नॉलॉजी विभाग येथून केंद्रात जाता येईल. माध्यम प्रतिनिधींना मीडिया सेंटरमध्ये मोबाइल नेता येईल. कर्मचारी व माध्यम प्रतिनिधींसाठी वाहन पार्किंग तेथेच असेल, असे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी सांगितले. स्ट्राँग रुममधून ईव्हीएम आणण्यासाठी लाल, पिवळा, गुलाबी, ग्रे, पर्पल, ऑरेंज या रंगाचे टी-शर्ट घातलेले कर्मचारी नेमले आहेत.
काय असेल मतमोजणी केंद्रावर?विधानसभा मतदारसंघनिहाय १४ टेबलविधानसभा मतदारसंघनिहाय पोस्टलसाठी १० टेबलमतमोजणीसाठी अधिकारी, कर्मचारी: १ हजारपोलिस, एसआरपीएफ, सीएसआरएफ जवान: ७००
१५० सीसीटीव्हीच्या निगराणीत बॅलेट युनिट२,०४० मतदान यंत्रे एमआयटी कॉलेज परिसरातील एका इमारतीतील स्ट्राँग रूममध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलिस बल, राज्य राखीव पोलिस बल, राज्य पोलिस दलाचे अधिकारी व जवान अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय संपूर्ण परिसर १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत आहे.- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी
मतदारसंघनिहाय किती फेऱ्या होणार?कन्नड २६ फेऱ्या : २ लाख १७ हजार ८९औरंगाबाद मध्य २३ फेऱ्या : २ लाख ११ हजार ५००औरंगाबाद पश्चिम २७ फेऱ्या : २ लाख ३५ हजार ७८४औरंगाबाद पूर्व २२ फेऱ्या : २ लाख ६ हजार ६३३ मतदानगंगापूर २५ फेऱ्या : २ लाख २७ हजार १५२वैजापूर २५ फेऱ्या : २ लाख ८८२एकूण : १२ लाख ९९ हजार ४०