येथे १७ जागांसाठी एकूण ४७ उमेदवार रिंगणात उतरले होते. शिवसेना मंत्री संदीपान भुमरे यांच्या गटाच्या दोन्ही पॕॅनलची समोरासमोर लढत होती. यामध्ये शिवसेना पुरस्कृत लोकविकास पॕॅनलचे प्रमुख साईनाथ सोलाट यांच्या नेतृत्वाखाली १३ उमेदवार विजयी झाले, तर शंकरराव वाघमोड यांच्या आदर्श ग्राम विकास पॕॅनलने २ उमेदवार विजयी झाले आहे, तर बिलाल शेख यांच्या जनता ग्रामविकास पॕॅनलचे २ उमेदवार विजयी झाले आहेत.
यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले.
शिवसेना पुरस्कृत लोकविकास पॕॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये दादासाहेब गलांडे, रामा भोजणे, मंदा दहिहंडे, मनोज थोटे, संतोष भिसे, रेणुका दिलवाले, उषा शिंदे, रहिमोद्दीन पठाण, आरती चाबुकस्वार, पूर्णाबाई गिऱ्हे, गंधारी गिऱ्हे, विद्या सेमक, लाला मोरे तर आदर्श ग्रामविकास पॕॅनलचे सुनीता वाघमोडे, अनंता माळवदे. जनता ग्रामविकास पॕॅनलचे बिलाल शेख, लतिफा शेख निवडून आले आहेत.
फोटो कॅप्शन : पिंपळवाडी येथील लोकविकास पॕॅनलचे विजयी उमेदवार जल्लोष साजरा करताना.