लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना भविष्याची वाट निवडण्यासाठी अनेक वेळा गोंधळ उडतो. यातूनच आवड नसलेल्या शाखेत प्रवेश घेतला जातो. याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. मात्र या महत्त्वाच्या क्षणी आपल्यासमोर आपल्या आवडीचे पर्याय असल्याची माहिती देणाऱ्या ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर’ला शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या तापडिया नाट्यमंदिर येथे शुक्रवारी (दि.२५) सुरुवात झाली. या फेअरचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या हस्ते झाले. पहिल्याच दिवशी फेअरला भेट देण्यासाठी पालक, विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.
विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी एकाच छताखाली सर्व प्रकारच्या शिक्षणाची माहिती मिळण्यासाठी लोकमततर्फे सहा वर्षांपासून अॅस्पायर एज्युकेशन फेअरचे आयोजन केले जाते. यावेळीही प्रतिवर्षाप्रमाणे अॅस्पायर एज्युकेशन फेअरला पालक, विद्यार्थ्यांचा पहिल्या दिवसापासून उदंड प्रतिसाद मिळत आहे.यावर्षी फेअरचे उद्घाटन विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या हस्ते फीत कापून केले. यावेळी लोकमतचे संपादक सुधीर महाजन, सहायक उपाध्यक्ष संदीप विश्नोई, वरिष्ठ सरव्यवस्थापक (जाहिरात विक्री प्रमुख, दक्षिण महाराष्ट्र) आलोक श्रीवास्तव, सहायक उपाध्यक्ष (जाहिरात विक्री प्रमुख - दिल्ली) क्षितिज चंद्रा, प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, प्रा. सतीश तांबट आदी उपस्थित होते.फीत कापल्यानंतर पाहुण्यांनी फेअरमध्ये सहभागी सर्व शिक्षणसंस्थांची पाहणी करून माहिती घेतली. लोकमतच्या या उपक्रमाबद्दल डॉ. तेजनकर यांनी आनंदही व्यक्त केला. अशा प्रकारच्या शिक्षणाच्या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. हा शैक्षणिक माहितीचा मेळा रविवारी (दि.२७) सायंकाळी ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यास पालक, विद्यार्थ्यांनी भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.विद्यार्थ्यांनो, फेअरला भेट द्या : अशोक तेजनकर४विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर आपण कोणत्या क्षेत्रात जावे, याची परिपूर्ण माहिती नसते. यामुळे त्या दोन-तीन दिवसांच्या कालावधीत अनेक वेळा चुकीचे पाऊल उचलले जाते. एकदा प्रवेश घेतल्यानंतर पुन्हा मागे वळता येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रातील करिअरला मुकावे लागते.४हा धोका टाळण्यासाठी पालकांनी पाल्यांना घेऊन लोकमत फेअरला भेट द्यावी, असे आवाहन प्रकुलगुरू डॉ.अशोक तेजनकर यांनी केले.४लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये सर्व प्रकारच्या शिक्षणाची परिपूर्ण माहिती असल्यामुळे एकाच छताखाली करिअर निवडण्यासाठी मदतही होईल, असेही त्यांनी सांगितले.४पालकांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन फेअरमध्ये भेट दिल्यास दहावी, बारावी उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांनाही भविष्यातील शिक्षणाच्या विविध मार्गाची ओळख होते. या विद्यार्थ्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्यासाठी फेअरची नक्कीच मदत होईल.विद्यार्थ्यांची बौद्धिक चाचणी४शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष करिअरसंबंधी बौद्धिक चाचणी दररोज सकाळी ११ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता होणार आहे. विद्यार्थ्यांची चाचणी घेतल्यानंतर त्यास ‘करिअर ग्यान’ हे १०० रुपये किमतीचे पुस्तक भेट देण्यात येणार आहे.