नांदेड : शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणार्या लोकमत समुहातर्फे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ‘एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४'चे आयोजन करण्यात आले आहे़ ३० मे ते ३१ जून दरम्यान मल्टीपर्पज हायस्कूल वजिराबाद, नांदेड येथे होणार्या प्रदर्शनात राज्यातील नामवंत शैक्षणिक संस्था, प्रोफेशनल कोर्सेस, अॅनिमेशन, फॅशन डिझायनिंग, हॉटेल मॅनेजमेंट, स्पोकन इंग्लिश आदी संस्था सहभागी होणार आहेत़ या एज्युकेशन फेअरचे प्रायोजक रत्नेश्वरी इन्स्टिट्यूट आॅफ पालिटेक्निक विष्णूपुरी, नांदेड हे आहेत. एस्पायर एज्युकेशन फेअर २०१४ राज्यस्तरावर होत असून यात नांदेड, अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे आणि सोलापूर या बारा जिल्ह्याचा समावेश आहे़ मोजकेच स्टॉल्स शिल्लक असल्याने शैक्षणिक क्षेत्रातील व्यावसायिकांनी आजच आपला स्टॉल बूक करावा, असे आवाहन संयोजकांतर्फे केले आहे़ अधिक माहितीसाठी लोकमत विभागीय कार्यालय, शिवाजीनगर, नांदेड येथे अथवा ९९२२४०२४१५ या क्रमांकावर संपर्क साधावा़ सहभागी संस्था पुढीलप्रमाणे, ग्रामीण सायन्स(व्होकेशनल) कॉलेज, विष्णुपूरी, नांदेड, श्री गुरु गोविंदसिंघ बी़जे़ कॉलेज, सिडको, नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णुपूरी, नांदेड, व्हीटसकॉम एज्युसोल्युशन, भाग्यनगर रोड, नांदेड, ढोले पाटील ग्रुप आॅफ इन्स्टीट्युट, पुणे, सहयोग एज्युकेशन कॅम्पस, विष्णुपूरी, नांदेड, एस़जी़एम़ विद्यालय, आनंदनगर, नांदेड, लाईफ एज्युकेशन इन्स्टीट्युट, भाग्यनगर रोड, नांदेड, आय़टी़ हब वजिराबाद, नांदेड, सृजन अॅनिमेशन, पुणे, जवाहरलाल दर्डा इन्स्टीट्युट आॅफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नॉलॉजी, यवतमाळ, डॉ़ डी़वाय़ पाटील एज्युकेशन कॉम्प्लेक्स, आकुर्डी, पुणे, संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी, कोपरगाव, सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टीट्युट पुणे, मातोश्री प्रतिष्ठान ग्रुप आॅफ इन्स्टिट्युशन नांदेड, एम़जी़एम़ कॉलेज, नांदेड, मोशन कोटा नांदेड स्टडी सेंटर, विसावानगर, नांदेड, विज्ञान केंद्र, वारंगा फाटा, ताक़ळमनुरी, जि़ हिंगोली यांचा समावेश आहे़ (वाणिज्य प्रतिनिधी) लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर २०१४ दिनांक ३० मे ते १ जून वेळ : सकाळी १० ते रात्री ९ स्थळ : मल्टीपर्पज ग्राऊंड, वजिराबाद, नांदेड
लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर
By admin | Published: May 28, 2014 12:34 AM