डॉ. हिमांशू गुप्ता, मुख्य प्रशासक
लोकमत प्रॉपर्टी शो २०२१ या भव्य गृह प्रदर्शनात येणाऱ्या ग्राहकांची आरोग्य तपासणी शेठ नंदलाल धूत हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आली. यासाठी प्रदर्शनाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर खास तपासणी केंद्र उघडण्यात आले होते. हॉस्पिटलचे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक येथे कार्यरत होते. यात बांधकाम व्यावसायिक, त्यांच्याकडील कर्मचारी, लोकमतचे कर्मचारी व प्रदर्शनाला भेट देणाऱ्या ग्राहक या सर्वांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी केली जात होती. सॅनिटायझर लावण्यात येत होते. प्रत्येकाला मास्क वापरणे, प्रदर्शनात गर्दी न करणे , सुरक्षित अंतर ठेवणे अशी माहिती दिली जात होती. प्रदर्शनात आलेल्या १०० टक्के लोकांची तपासणी झाली. या प्रदर्शनाच्या उदघाटनासाठी आलेल्या मनपा आयुक्तांनी हा आरोग्य उपक्रम कौतुकास्पद असल्याचे म्हटले.
लोकमत प्रॉपर्टी शोचे आयोजन उत्तम पद्धतीने करण्यात आल्याने हे प्रदर्शन यशस्वी ठरले.
धूत हॉस्पिटल कोरोनामुक्त औरंगाबादसाठी सतत प्रयत्न करत आहे. कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंत अनेक रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत. कोविड रुग्ण असो व नॉन कोविड रुग्ण सर्वांवर उपचार केले जात आहे. हॉस्पिटलने घेतलेले हे व्रत पुढे निरंतर सुरू राहील. औरंगाबाद कोरोना मुक्तीसाठी सदैव धूत हॉस्पिटल प्रयत्नशील आहे.