औरंगाबाद : लोकमत सखी मंचतर्फे महिलांच्या कलागुणांना प्रसिद्धी देण्यासाठी सखी महोत्सव १७ मे रोजी होत आहे. लोकमत हॉल, लोकमत भवन, जालना रोड, औरंगाबाद येथे हा सखी महोत्सव होईल. महिलांमध्येही कलागुण असतात. काही जणी अंगी असलेली कला छंद म्हणून जोपासतात. या कलेलाच व्यासपीठ मिळवून देण्याचे काम सखी मंचतर्फे करण्यात येत आहे. या महोत्सवात महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यात समूह रांगोळी, ब्रायडल मेकअप, फॅन्सी ड्रेस, सोलो डान्स आणि मेंदी स्पर्धा होतील. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी लोकमत भवन, जालना रोड, औरंगाबाद येथे किंवा ९५५२५६४५६० या क्रमांकावर संपर्क साधावा. स्पर्धकांनी स्पर्धेच्या आधी अर्धा तास साहित्यानिशी उपस्थित राहणे आवश्यक आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या बक्षिसांचे प्रायोजकत्व सुवर्णस्पर्श ज्वेलर्सने स्वीकारले आहे. तसेच सहभागी स्पर्धकांनादेखील बक्षिसे देण्यात येणात येणार आहेत. त्यांचे प्रायोजकत्व रवी मसाले यांनी स्वीकारले आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश ‘लोकमत’च्या मागच्या गेटने देण्यात येणार आहे. सखी सम्राज्ञी स्पर्धेची अंतिम फेरी सखी सम्राज्ञी या स्पर्धेची अंतिम फेरी १७ मे, शनिवारी सायंकाळी ६ वाजता होईल. त्याचबरोबर सारेगमप फेम मंगेश बोरगावकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी स्पर्धकांनी एक तास आधी लोकमत हॉल, लोकमत भवन जालना रोड, औरंगाबाद येथे उपस्थित राहावे. स्पर्धा वेळ मेंदी दु. १२.०० रांगोळीदु. १२.०० ब्रायडल मेकअप दु. १२.०० सोलो डान्स दु. ३.०० फॅन्सी ड्रेस दु. ३.००
लोकमत सखी महोत्सव उद्या
By admin | Published: May 16, 2014 12:30 AM