शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

शेतकऱ्यांसाठी ‘लोकमत’ची ‘हेल्पलाईन’

By admin | Published: September 10, 2015 12:06 AM

बीड : दुष्काळसदृश्य परिस्थिती, शासन, प्रशासन आपली भूमिका बजावत आहे. मदतीसाठी सर्वजण कटीबद्ध आहेत. ‘लोकमत’ने देखील सामाजिक बांधिलकी जपत ‘हेल्पलाईन’च्या माध्यमातून

बीड : दुष्काळसदृश्य परिस्थिती, शासन, प्रशासन आपली भूमिका बजावत आहे. मदतीसाठी सर्वजण कटीबद्ध आहेत. ‘लोकमत’ने देखील सामाजिक बांधिलकी जपत ‘हेल्पलाईन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणींना वाचा फोडण्याचे निश्चित केले आहे.अन्न सुरक्षा योजनेंतर्गत शेतकरी, शेतमजुरांना ३ रु. दराने तांदूळ व २ रु. किलो दराने गहू तसेच मागेल त्याला शेततळे देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. मनरेगाच्या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे २ लाख लोकांना रोजगार उपलब्ध करण्याचे आश्वासन आहे. भविष्यात शैक्षणिक शुल्क माफी, वीज बिल भरण्याचेही शासनाचे धोरण आहे. शेतकऱ्यांसाठी अशा घोषणा आणि प्रत्यक्षात अशा योजनाही आहेत. मात्र त्याच्या अंमलबजावणीत वा थेट लाभ मिळण्यात येत असलेल्या अडचणी आम्हाला जरुर कळवा, शिवाय आपल्या गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या मांडा, टँकर किती वेळा येते? ते कळवा यासंपूर्ण समस्यांचा गोषवारा आम्ही बातमी स्वरुपात मांडू. प्रशासनाची बाजू समजून घेऊन आमचे प्रतिनिधी समस्या सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. आपल्यासाठी खालील क्रमांकावर हेल्पलाईन सुरू आहे. आपण लोकमतच्या प्रतिनिधींशी ९५५२५५३३४७, ९५५२५५३३६१ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधू शकता.दुष्काळाविरुद्ध लढणारे बहाद्दर शेतकरी आणि त्यांना साथ देणारी सेवावृत्तीचे माणसे आणि संस्थांचीही दखल ‘लोकमत’मधून घेतली जाईल. स्वत:चे पीक मोडून गावाला पाणी देणारे शेतकरी, टंचाईच्या झळा कमी करण्यासाठी सरसावलेले शिक्षक व त्यांनी सुरू केलेले टँकर अशा अनेक उजव्या बाजू समाजात आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना, दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांना मदतीसाठीही पुढे येणारे हात आहेत. अशांनाही आपला कार्यवृत्तांत वरील मोबाईल क्रमांकावर जरुर कळवावा.