औरंगाबाद : लोकसभेसाठी झालेल्या मतदानाची गुरुवारी (दि.२३) चिकलठाणा एमआयडीसीमध्ये मतमोजणी होणार असून, शहर पोलीस तेथे मोठा बंदोबस्त तैनात करणार आहे. निकालानंतर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता प्रमुख उमेदवार आणि राजकीय पक्ष कार्यालयांबाहेरही पोलीस तैनात केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान झाले. मतदानाच्या तब्बल एक महिन्यानंतर २३ मे रोजी चिकलठाणा एमआयडीसीतील मेट्रॉन कंपनीत मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. या निवडणुकीत आपणच बाजी मारू असा दावा प्रमुख उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत. त्यातून एक चढाओढीचे वातावरण तयार झाले आहे. मतमोजणीसाठी उमेदवार, मतदान प्रतिनिधींसह विविध राजकीय पक्षांचे हजारो कार्यकर्ते मतमोजणीस्थळी जमा होतील. मतमोजणीचा निकाल विरोधात गेल्यास कदाचित कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.सूत्रांनी सांगितले की, मतमोजणीस्थळी दोन पोलीस उपायुक्त, तीन सहायक पोलीस आयुक्त, १० पोलीस निरीक्षक , ३० सहायक निरीक्षक- उपनिरीक्षक, २०० कर्मचारीआणि ६० महिला पोलीस कर्मचारी, असा हा बंदोबस्त असेल. याशिवाय शहराच्या संवेदनशील भागात पोलिसांचे फिक्स पॉइंट लावण्यात येत आहेत. गस्त वाढविण्यात आली आहे. साध्या वेशातील पोलीस अधिकारी, कर्मचारी गस्त करीत आहेत.उमेदवारांच्या निवासस्थानीही बंदोबस्तलोकसभा निवडणूक लढविणाऱ्या प्रमुख उमेदवारांच्या निवासस्थानी आणि राजकीय पक्षाच्या कार्यालयाला २३ मे रोजी पोलीस बंदोबस्त दिला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.असा असेल शहरात अतिरिक्त बंदोबस्तमतमोजणीच्या दिवशी शहरातही मोठा बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी दिली. ३ पोलीस उपायुक्त, ५ सहायक पोलीस आयुक्त, २९ पोलीस निरीक्षक, ११३ पोलीस उपनिरीक्षक, १ हजार २८२ पोलीस कर्मचारी, २१० महिला पोलीस, १६ कॅमेरामन, राज्य राखीव दल आणि केंद्रीय राखीव दलाच्या प्रत्येकी एका कंपनीचा यात समावेश आहे.
लोकसभा निवडणूक मतमोजणीस्थळी शहर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:11 PM
लोकसभेसाठी झालेल्या मतदानाची गुरुवारी (दि.२३) चिकलठाणा एमआयडीसीमध्ये मतमोजणी होणार असून, शहर पोलीस तेथे मोठा बंदोबस्त तैनात करणार आहे. निकालानंतर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता प्रमुख उमेदवार आणि राजकीय पक्ष कार्यालयांबाहेरही पोलीस तैनात केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.
ठळक मुद्दे खबरदारीची उपाययोजना : प्रमुख उमेदवारांचे पक्ष कार्यालय आणि निवासस्थानीही पोलीस तैनात