शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
4
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
5
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
6
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
7
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
8
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
9
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
10
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
11
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
12
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
13
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
15
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
16
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
17
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
18
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
19
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
20
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

जलवाहिनींच्या क्रॉस कनेक्शनला मोठा विलंब; छत्रपती संभाजीनगरात आजही निर्जळी

By मुजीब देवणीकर | Published: February 15, 2024 11:40 AM

यंदा उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाईच्या झळा बसू नयेत म्हणून ९०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी टाकली.

छत्रपती संभाजीनगर : मुबलक पाण्यासाठी टाकण्यात आलेल्या ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीसाठी बुधवारी दिवसभर क्रॉस कनेक्शनचे काम सुरू होते. फारोळ्यातील काम नियोजित वेळेत पूर्ण झाले. जायकवाडीतील क्रॉस कनेक्शनचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे गुरुवारी शहराला निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत महापालिकेने शटडाउनमध्ये विविध कामे केली.

यंदा उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाईच्या झळा बसू नयेत म्हणून ९०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी टाकली. या जलवाहिनीची टेस्टिंग बाकी आहे. त्यापूर्वी जायकवाडी, फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात क्रॉस कनेक्शनची कामे करणे आवश्यक होती. त्यासाठी बुधवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत शटडाउन घेण्यात आले. सिडको-हडकोसह शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने क्रॉस कनेक्शनची कामे हाती घेतली होती. दिवसभरात फारोळा येथील क्रॉस कनेक्शनचे काम पूर्ण झाले. जायकवाडी येथील कामाला रात्री १२ ते १ वाजण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मनपाने केली छोटी-मोठी कामेसिडको-हडकोसाठी टाकलेल्या स्वतंत्र एक्स्प्रेस जलवाहिनीसाठी बीड बायपास रस्त्यावर दोन ठिकाणी क्रॉस कनेक्शनचे काम करण्यात आले. फारोळा फाटा येथे १२०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील एक व्हॉल्व्ह खराब झाला होता, तो बदलण्यात आला. नक्षत्रवाडी येथील एमबीआरला गळती लागली होती, वेल्डिंग करून ही गळती बंद करण्यात आल्याची माहिती मनपाचे कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी दिली.

दुपारी पाणी येण्याची शक्यताजायकवाडी ते नक्षत्रवाडी, तसेच नक्षत्रवाडी ते सिडको एन-५ पर्यंतची जलवाहिनी शटडाउनमुळे पूर्णपणे रिकामी करण्यात आली. पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर अगोदर दोन्ही ठिकाणच्या जलवाहिन्या टप्प्याटप्प्याने भरून घ्याव्या लागणार आहेत. त्यानंतरच शहरात पाणी येण्यास सुरुवात होईल. रिकाम्या जलवाहिन्या पूर्ण क्षमतेने भरण्यास वेळ लागतो, त्यामुळे शहरात गुरुवारी सकाळी किंवा दुपारपर्यंत पाणी येईल.

नागरिकांचे पाण्याविना हालबुधवारी घेतलेल्या शटडाउनची माहिती मनपाने काही तास अगोदर प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे नागरिकांना पाणी साठवून ठेवण्यासाठी वेळच मिळाला नाही. बुधवारी दिवसभर पाण्याचा ठणठणाट सुरू होता. ज्या वसाहतींना पाणी मिळणार होते त्यांना गुरुवारी रात्री किंवा शुक्रवारीच पाणी मिळेल. अगोदरच आठ ते दहा दिवसांनंतर अनेक वसाहतींना पाणीपुरवठा होतोय. त्यात आणखी दोन दिवस वाढ हाेणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी