- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : आधार कार्ड लिंक करा, त्यातील तांत्रिक दुरुस्ती किंवा नवीन कार्ड काढण्यासाठीचे अनधिकृत आधार कार्ड नोंदणी सेंटर शासनाने बंद केले आहेत. त्यामुळे नागरिकांची लूट थांबली, असे असले तरी टपाल कार्यालयात आधार कार्डवरील दुरुस्ती वा नवीन नोंदणीसाठी तीन महिने वेटिंग आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
सातारा, देवळाई या दोन्ही वॉर्डांत ७५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असून, नागरिकांना सेवासुविधा संघर्षाशिवाय मिळत नाहीत. शाळा, कॉलेज प्रवेश, शासकीय योजना, बँक खाते उघडणे इत्यादी महत्त्वाच्या सेवासुविधांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. घाईगडबडीत काढलेल्या आधार कार्डवर चुका राहत असल्याने आॅनलाईन अर्ज भरताना आधार लिंक होत नाही. त्यामुळे अनेकांना योग्य स्पेलिंग जुळविण्यासाठी आधार केंद्रावर जावे लागते; परंतु त्याठिकाणीही आज सर्व्हर डाऊन आहे, तुम्ही उद्या या, अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली जात आहे.
शाळा, महाविद्यालयांना सुटीमुळे गर्दीशाळा, महाविद्यालयांना सुट्या असल्याने विद्यार्थी व पालक आधार कार्डमधील चुकांची दुरुस्ती किंवा नवीन कार्ड बनविण्यासाठी सातारा टपाल कार्यालयात जातात; परंतु त्यांना काही तरी कारण सांगून तीन महिन्यांपुढची तारीख देऊन परत पाठविले जात आहे. तीन महिन्यांपर्यंतची प्रतीक्षा या केंद्रावर असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. इतरत्र आधार केंद्रे बंद झाल्याने शासकीय यंत्रणा असलेल्या ठिकाणी नागरिकांना खात्रीलायकपणे नोंदणी व दुरूस्ती करता यावी म्हणून हा उपक्रम राबविला आहे;परंतु येथे सोयी पेक्षा गेैरसोयीचे ठरत आहे. याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
वरिष्ठ अधिकारी लक्ष घालणारआधार सेंटरविषयी येथील अधिकाऱ्यांची कार्यालयीन चौकशीदेखील करण्यात आलेली आहे. सातारा टपाल कार्यालयातील तांत्रिक बाबी तपासणीसाठी मुख्यालयातून अधिकारी पाठविला जाणार आहे. या ठिकाणी गतिमान नवीन यंत्रणा बसविण्याचेही प्रयोजन आहे. या ठिकाणी भेट देऊन खरी परिस्थिती तपासणार आहोत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.