कोरोनाकाळात इंधन दरवाढ करून केंद्राकडून जनतेची लुट; केंद्र सरकार विरोधात कॉंग्रेसची जोरदार निदर्शेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 05:24 PM2021-07-17T17:24:20+5:302021-07-17T17:24:57+5:30
Fuel prize hike : बैलगाडी व सायकल रँलीस पोलिसांनी परवानगी नाकारल्याने ऐनवेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात कॉंग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
पैठण : पेट्रोल व डिझेलची भाव वाढ करून सर्वसामान्य जनतेला लूटण्याचे एकमेव काम केंद्र सरकारचे सुरू आहे. महामारीच्या काळात भाववाढ कमी करून जनतेला दिलासा द्यावा नसता मोदी सरकारने चालते व्हावे असा इशारा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ कल्याण काळे यांनी पैठण येथे आयोजित कॉंग्रेसच्या आंदोलनात बोलताना दिला. ( Congress's strong protest against the central government)
पेट्रोल डिझेल व गँसच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने केंद्र सरकारच्या दरवाढी विरोधात पैठण तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी आयोजित बैलगाडी व सायकल रँलीस पोलिसांनी परवानगी नाकारल्याने ऐनवेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात कॉंग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ कल्याण काळे, माजी मंत्री अनिल पटेल, प्रदेश सचिव रवींद्र काळे, तालुकाध्यक्ष विनोद तांबे, शहराध्यक्ष तथा गटनेते हसनोद्दीन कटयारे, जिल्हा सरचिटणीस किरण पाटील, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर दसपुते, यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी गोरगरीबांना शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, लुटारु मोदी सरकार चले जाव, घरगुती गँस दरवाढ कमी झालीच पाहिजे, मोदी सरकार हाय हाय अशा घोषनांनी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून टाकला. यावेळी मंडळ अधिकारी शैलेश जोशी व पेशकर राजेश शिंदे, सुनील गुणावत यांना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
आंदोलनात भिकाजी आठवले, फाजल टेकडी,पाशा मंजन,अंबादास ढवळे, राजू ठाणगे, अल्पसंख्याक सेल शहर अध्यक्ष जुनेद गाजी, संभाजी काटे,रावसाहेब नाडे, अमोल आव्हाड, किरण जाधव, दिनेश श्रीसुंदर, रविंद्र आमले, पवन शिसोदे, भागचंद फोलाने,अजय करकोटक,अज्जु कट्यारे, कल्याण मगरे, तुकाराम लिंबोरे, यांच्यासह युवक कॉंग्रेस,अल्पसंख्याक सेल, सेवादल,ओबिसी सेल, अनुसूचित जमाती सेल तसेच विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.