औरंगाबाद : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त सकल जैन समाजातर्फे गुरुवारी गुलमंडी येथे आयोजित कार्यक्रमात महापालिकेस सॅनिटरी नॅपकीन नष्ट करणा-या २१ मशीन सुपूर्द करण्यात आल्या.सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, कार्याध्यक्ष आ. सुभाष झांबड, उपाध्यक्ष विकास जैन, उपाध्यक्ष व प्रकल्पप्रमुख प्रशांत देसरडा, महासचिव महावीर पाटणी, भगवान महावीर जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विनोद बोकडिया यांच्या हस्ते महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांना या मशीन सुपूर्द करण्यात आल्या. याप्रसंगी खा. चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, किशनचंद तनवाणी, अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, बसवराज मंगरुळे, कल्याण काळे, नामदेव पवार, अनिल मकरिये, नगरसेविका कीर्ती शिंदे, राखी देसरडा, शिल्पाराणी वाडकर, राजू तनवाणी, त्र्यंबक तुपे, महेश माळवदकर, गोपाळ कुलकर्णी, सहप्रकल्पप्रमुख रवी मुगदिया, मनोज बोरा, स्वप्नील पारख, ललित पाटणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरात कचराकोंडी निर्माण झाली असून, सॅनिटरी नॅपकीन बायोवेस्टचा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. महापालिकेला सुपूर्द करण्यात आलेल्या २१ मशीनमुळे शहरातील सॅनिटरी नॅपकीन नष्ट करून विल्हेवाटीस हातभार लागेल. प्रत्येकी २० हजार रुपये किमतीची ही मशीन आहे.या मशीन रेल्वेस्टेशन जैन श्रीसंघ, डीकेएमएम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, सिडको रॉयल ग्रुप, तेजस्विनी ग्रुप, सखी मंच महिला ग्रुप, जैनम महिला मंच ए. बी., रॉयल लायन्स क्लब, रवींद्र खिंवसरा, रवी मसाले-श्री जैन श्वेतांबर तेरापंथ सभा, सीमा सुभाष झांबड, आ. सुभाष झांबड, ए. एम. पी. इन्फ्र ा ग्रुप, श्री महावीर इंटरनॅशनल मेट्रो सिटी, सकल जैन ब्ल्यू बेल परिवार, साई सिद्धांत असोसिएटस्, प्रसाद कुमार कुंकुलोळ, के. के. वेंचर्स, पी. यू. जैन होस्टेल, ओस्वाल जैन ट्रस्ट, सकल जैन समाज यांच्याकडून मिळाल्या.सकल जैन समाज देशासमोर आदर्शपैठणगेट येथून मुख्य शोभायात्रा सुरू होण्याआधी साधू-संतांनी महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचा संदेश दिला. ‘सकल जैन समाज एकत्र येऊन औरंगाबादेत महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा केला जातो. याची ख्याती संपूर्ण देशात पोहोचली आहे. मी खास या जन्मकल्याणक शोभायात्रेसाठी या शहरात आलो आहे,’ असा गौरव करीत आचार्य कुशाग्रनंदीजी म. सा. म्हणाले की, येथील सकल जैन समाजाने देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. ही एकता, अखंडता अशीच टिकून ठेवा. भगवान महावीरांनी दाखविलेल्या आदर्श जीवन पद्धतीचा अवलंब प्रत्यक्ष जीवनात करा, असे आवाहनही आचार्यजींनी केले. मुनीश्री आगमसागरजी म. सा. म्हणाले की, अहिंसा धर्माचे सर्वांनी पालन करावे. आपल्यापासून कोणत्याही प्राणिमात्रास इजा होऊ नये, याची नेहमी काळजी घ्यावी, तसेच सकल जैन समाजाने शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले.भगवान महावीरांचा संदेश ‘जिओ और जीने दो’ याचा विश्वात प्रचार करा, असे मार्गदर्शन पुनीतसागरजी म. सा. यांनी केले. यानंतर आचार्यजींनी मांगलिक दिले.महारक्तदान शिबिरात३५२ दात्यांचे रक्तदानऔरंगाबाद : सकल जैन समाज आणि भगवान महावीर मेडिकल फाऊंडेशनतर्फे गुरुवारी स.भु. महाविद्यालयाच्या प्रांगणावर घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरात ३५२ दात्यांनी रक्तदान केले. सकाळी ११ वा. महारक्तदान शिबिरास प्रारंभ झाला. या शिबिरात समाजबांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. शिबिरात रक्तदान करण्यासाठी युवक, महिला व युवतींनीही मोठा सहभाग नोंदविला. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून रक्तदानाद्वारे एखाद्याचा प्राण वाचू शकतो. याच भावनेतून शिबिरात ३५२ दात्यांनी रक्तदान करून रक्ताचा तुटवडा दूर होण्यासाठी आणि समाजसेवेत एक वेगळे योगदान दिले. घाटी रुग्णालय येथील विभागीय रक्तपेढी, लायन्स ब्लड बँक, महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल ब्लड बँक, भगवान महावीर मेडिकल फाऊंडेशन, अमृता ब्लड बँक, औरंगाबाद ब्लड बँक, सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल ब्लड बँक, लोकमान्य ब्लड बँक आदी रक्तपेढ्यांतर्फे रक्तसंकलन करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रकल्पप्रमुख डॉ. प्रकाश झांबड, डॉ. प्रकाश पाटणी, अध्यक्ष डॉ. सुनील साहुजी, सचिव डॉ. अनिल नहार, डॉ. सन्मती ठोले, डॉ. तुषार चुडीवाल, डॉ. शैलेश चांदीवाल, डॉ. नरेंद्र खटोड, डॉ. सुभाष लुणावत, डॉ. प्रफुल्ल संचेती, डॉ. सुशील बोरा, डॉ. गौतम जैन, डॉ. ईश्वर ललवाणी, डॉ. जितेंद्र कासलीवाल आदींसह रक्तपेढीतील डॉक्टर्स, कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.रोपांचे वितरणस.भु. प्रांगणात आ. सुभाष झांबड परिवारातर्फे नागरिकांना रोपांचे वितरण करण्यात आले. विविध प्रकारची रोपे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली. अनेकांनी रोपटे नेऊन झाडांचे संवर्धन क रण्याचा संकल्प केला.योगदान देणाºया परिवारांचा सत्कारभगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवासाठी विविध माध्यम आणि सेवेतून योगदान देणाºया परिवारांचा सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्याध्यक्ष आ. सुभाष झांबड यांच्यासह महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.