लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भगवान महावीर हे फक्त जैन समाजाचे नसून ते सर्वांचे आहेत. भगवान महावीरांच्या विचारांना मंदिरापुरतेच मर्यादित न ठेवता ते विचार संपूर्ण जगासमोर न्यावेत, असे आवाहन आचार्य कुशाग्रनंदीजी महाराज यांनी येथे केले.भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवांतर्गत चंद्रसागर दिगंबर जैन धर्मशाळामध्ये गुरुवारी सकाळी व्याख्यानमालेत त्यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी मुनीश्री अजयऋषीजी महाराज, आर्यिका कुलभूषणमती माताजी व भट्टारक अरिहंतऋषी यांची उपस्थिती होती. प्रारंभी,मोहनलालनगर जैन मंदिरापासून आचार्यजींची सकाळी ७ वाजता शोभायात्रा निघाली. राजाबाजार येथील जैन मंदिरात आचार्यजींचे आगमन झाले. यानंतर शहागंज येथील चंद्रसागर धर्मशाळेत व्याख्यानमालेत आचार्यजींनी सर्वांना भगवान महावीरांची देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला किती आवश्यकता आहे, हे समाजबांधवांना समजून सांगितले. सूत्रसंचालन माजी सचिव महावीर ठोले यांनी केले. यावेळी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचे सर्व पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.चंद्रसागर दिगंबर जैन धर्मशाळेत ३१ रोजी डॉ. आनंद निकाळजे यांचे ‘हृदयघात प्रथमोचार व निवारण’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानमालेचा लाभ समाजबांधवांनी घ्यावा, असे आवाहन चंद्रसागर दिगंबर जैन धर्मशाळेचे अध्यक्ष आनंद सेठी यांनी केले.
भगवान महावीरांच्या विचारांची देशाला गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 1:03 AM
भगवान महावीर हे फक्त जैन समाजाचे नसून ते सर्वांचे आहेत. भगवान महावीरांच्या विचारांना मंदिरापुरतेच मर्यादित न ठेवता ते विचार संपूर्ण जगासमोर न्यावेत, असे आवाहन आचार्य कुशाग्रनंदीजी महाराज यांनी येथे केले.
ठळक मुद्देआचार्य कुशाग्रनंदीजी महाराज : महावीर व्याख्यानमालेला सुरुवात