शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

परतीच्या पावसाने मराठवाड्यातील ३० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 1:24 PM

७० टक्क्यांवर शेतीला ओल्या दुष्काळाचा फटका

ठळक मुद्दे८ हजार ४५० गावे बाधित  ३ ते ४ दिवसांत पंचनामे पूर्ण करा 

औरंगाबाद : मराठवाड्यातील सुमारे ३० लाख हेक्टरवरील पिकांचे आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल विभागीय प्रशासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिला. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी मराठवाड्यात परतीच्या पावसाने झालेल्या पीक नुकसानीचा आढावा प्रशासनाकडून घेतला. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विभागातील जिल्हानिहाय पिकांच्या नुकसानीची माहिती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे  शासनाला दिली. 

प्राथमिक अहवालानुसार विभागात एकूण ५२ लाख ६५ हजार १६५.९६ हेक्टर पेरणीलायक क्षेत्र आहे. त्यातील ४८ लाख ७० हजार १९४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. विभागातील ८ हजार ५१४ पैकी ८,४५० गावांना आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसाचा फटका बसला आहे. ४३ लाख १ हजार ४३६ पैकी ३० लाख २५ हजार ७६२ शेतकरी बाधित झाले आहेत. जिरायती आणि बागायती मिळून सुमारे २९ लाख ५७ हजार ६०० हेक्टर क्षेत्र आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे नष्ट झाले आहे. सोयाबीनचे १२ लाख २८ हजार ९४० हेक्टर, कापसाचे ११ लाख ४४ हजार ५२९ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले आहे. इतर खरीप हंगामातील ५ लाख ८४ हजार १३१ हेक्टवरील पिके वाया गेली आहेत. ७० टक्के नुकसान झाल्याची प्राथमिक टक्केवारी समोर आली आहे. 

मराठवाड्यात दोन तालुक्यांत कोरडा दुष्काळमराठवाड्यात अतिवृष्टीचे पंचनामे सुरू असताना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात दुष्काळ असल्याचे परिपत्रक शासनाने काढले आहे. अंबाजोगाईत गंभीर तर परांडा तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे शासनाने परिपत्रकात म्हटले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात ७० टक्क्यांच्या आसपास पाऊस झालेला असताना त्या तालुक्याचा समावेश दुष्काळात केला गेला नाही.

३ ते ४ दिवसांत पंचनामे पूर्ण करा ऑक्टोबर महिन्यात विभागात ३३७ टक्के पाऊस सरासरीच्या अधिक झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामात हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी कोरड्या दुष्काळाने तर यावर्षी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने यंत्रणेला दिले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार बाजरी ९० टक्के, मका ९० टक्के , सोयाबीन ८० टक्के तर कापसाचे ७५ टक्के नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे देण्यात आला आहे. 

जिल्हा     बाधित गावे       नुकसान टक्केवारीउस्मानाबाद    ७३२    ४१.४३%नांदेड    १,४८८    ५४.२५%औरंगाबाद    १,३५५    ५९.०५%परभणी    ८४३    ५९.३९%हिंगोली    ७०७    ६०.९३%लातूर    ९५१    ६२.२०%बीड    १,४०२    ७३.३२%जालना    ९७२    ७०.४०%एकूण    ८,४५०    ७० %च्या आसपास 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी