शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
5
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
6
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
7
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
9
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
10
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
11
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
12
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
13
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
14
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
15
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
16
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
17
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
18
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
19
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
20
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८४ ग्रामपंंचायतींची लॉटरी, इमारत बांधकामासाठी मिळणार निधी

By विजय सरवदे | Published: May 15, 2024 11:33 AM

स्वनिधीच्या खर्चापासून सुटका, काय आहे योजना?

छत्रपती संभाजीनगर : पंचायतराज व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक म्हणून ग्रामपंचायतींकडे पाहिले जाते. त्यामुळेच अलीकडे वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा केला जातो. त्यातून गावांत विकासकामे करणे सुकर झाले आहे. मात्र, जिल्ह्यातील ८७० पैकी १४३ ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारतच नव्हती. इमारत उभारण्यासाठी जिल्हा परिषदेकडे सुमारे १२० ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी शासनाने ‘बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनें’तर्गत ८४ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव मंजूर केले आहेत.

शासनाने तूर्तास ८४ प्रस्तावांना मंजुरी दिली असली तरी आचारसंहिता उठल्यानंतर उर्वरित ३६ प्रस्तावांतील त्रुटींची पूर्तता करून जि. प. पंचायत विभागामार्फत ते शासनाकडे सादर केले जाणार असल्याचे पंचायत विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

जिल्ह्यात ८७० पैकी १४३ ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नाही. इमारत नसलेल्या अनेक ग्रामपंचायतींचा कारभार शाळांच्या खोल्यांत, अंगणवाड्या तसेच किरायाच्या खोलींतून चालतो. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर जिल्हा परिषदेने ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी निधीचा प्रस्ताव ठेवला होता. पण, त्यावर निर्णय झाला नव्हता. दरम्यान, गेल्या नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय तर झालाच. शिवाय, या योजनेत ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी स्वनिधी खर्च करण्याची असलेली अटही रद्द करण्यात आली.

या योजनेंतर्गत २००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना आता १५ लाखांऐवजी २० लाख रुपये आणि २००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १८ लाखांऐवजी २५ लाख अनुदान मिळणार आहे. ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी यापेक्षा अधिक निधीची गरज पडली तर शासनाच्या इतर योजना, वित्त आयोगाचा निधी, जिल्हा ग्रामविकास निधी, स्थानिक विकास निधी (खासदार, आमदार निधी) यामधून तो दिला जाणार आहे.

काय आहे योजना?या योजनेंतर्गत स्वतंत्र इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना स्वत:ची कार्यालयीन इमारत उभारण्यासाठी शासन निधी देणार आहे. ही योजना १७ जानेवारी २०१८ पासून सुरू झाली. पण, तेव्हा शासनाकडून ९० टक्के निधी देण्याची याेजनेत तरतूद होती. तसेच, ग्रामपंचायतींना स्वत:चा १० टक्के निधी खर्च करण्याची अट होती. आता शासन १०० टक्के निधी देणार आहे. सुरुवातीला सन २०१८-१९ ते २०२१-२२ पर्यंतच ही योजनेची मुदत होती. ती आता सन २०२७-२८ या वर्षापर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायतAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद