तक्रारदार शुभम राजेंद्र टाक (२७, रा. विश्रांतीनगर) हे खासगी कंपनीत सेल्समन आहेत. मार्च महिन्यात त्यांना अनोळखी महिलेने मोबाईलवर कॉल करून ती बजाज फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. कंपनीकडून तुम्हाला पाच लाख रुपये विनातारण आणि झटपट कर्ज देते, असे ती म्हणाली. तक्रारदार यांनाही पैशाची आवश्यकता असल्याचे तिला सांगितले. यानंतर त्या महिलेसह अन्य एक महिला आणि व्यक्तीने टाक यांच्याशी संपर्क साधून सर्व्हिस चार्ज, जीएसटीची रक्कम, आरोग्य पॉलिसीच्या नावाखाली वेळोवेळी पैसे उकळले. आरोपींनी ७२ हजार ८०० रुपये उकळल्यानंतरही कर्ज दिले नाही. उलट ते अन्य काही तरी कारण सांगून तक्रारदार यांना कर्ज देण्यास सतत टाळाटाळ करीत होते. मार्चपासून कालपर्यंत हा प्रकार सुरू होता. आरोपींनी आपली फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात येताच टाक यांनी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. सहायक उपनिरीक्षक फरताळे तपास करीत आहेत.
विनातारण कर्जाच्या आमिषाने ७२ हजाराने गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:04 AM