औरंगाबाद : ॲड. माधवराव हरिभाऊ बोर्डे (७३, रा. बानाई, नंदनवन कॉलनी) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. ते संत कबीर शिक्षण प्रसारकचे अध्यक्ष होते. त्यांनी ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून औरंगाबाद शहरासह, सिल्लोड,सोयगाव, वैजापूर परिसरात शाळा,वस्तीगृह सुरू केले. १५ ऑगस्ट २०२० रोजी त्यांचा ‘दादा गौरव ग्रंथ’ प्रकाशित झाला होता. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कार्यकारी समिती सदस्य, सिनेट सदस्यासह विविध पदे भूषविली. नामांतर चळवळीत ते सक्रिय होते. त्यांना नुकतीच कर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, कमलेश, राहुल, धनंजय ही तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नंदनवन कॉलनीतील वामनदादा कर्डक खुले रंगमंच येथे रविवारी दुपारी १ वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर दुपारी २.३० वाजता छावणी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (फोटो)
माधवराव बोर्डे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:07 AM