शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

मांडकीतील इनामी जमिनींवर माफियांचा डोळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 1:19 PM

मांडकी शिवारालगत सिडको झालर क्षेत्रात आरक्षित केलेल्या जमिनीत वीस बाय तीसचे प्लॉट पाडून विक्री करण्याचा सपाटा सुरू आहे.

ठळक मुद्देग्रीन झोनमध्ये येथे जमीननिम्न नागरी आरक्षणात वीस बाय तीसची प्लॉटिंग

औरंगाबाद : नारेगावपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मांडकी शिवारालगत सिडको झालर क्षेत्रात आरक्षित केलेल्या जमिनीत वीस बाय तीसचे प्लॉट पाडून विक्री करण्याचा सपाटा सुरू आहे. सेमी पब्लिक सेक्टरमधील जमिनीत ६०० स्क्वे.फुटांचे प्लॉट पाडण्यात येत आहेत. शेजारील वक्फ बोर्डाची सुमारे शेकडो एकर जमीन भूमाफियांच्या डोळ्यात आली आहे.

सिडकोचे तर झालर क्षेत्राकडे दुर्लक्ष सुरू आहे. परंतु वक्फ बोर्डाचेदेखील त्यांच्या जमिनींकडे लक्ष नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. इनामी जमिनींची वक्फ बोर्डाने पाहणी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. आरक्षण नसलेल्या जमिनीलगत वक्फ बोर्डाच्या जमिनी आहेत. त्यासाठी नेमलेले मुत्तवल्ली हयात नाहीत. वहितीमध्ये असलेली नावेदेखील वगळण्यात आली आहेत. त्यामुळे भूमाफियांच्या नजरेत अशा जमिनी येऊ लागल्या आहेत. 

सिडकोने एकूण सहा झोनसाठी बनविलेल्या जमीन आरक्षण आराखड्यात झोन क्र.३ मध्ये पिसादेवी, गोपाळपूर, साजापूर, अंतापूर, मांडकी, दौलतपूर, मल्हारपूर, रामपूर, कच्चीघाटी, सुलतानपूर, फतेपूर, हिरापूर ही गावे आहेत. या पट्ट्यात ग्रीन झोनमध्ये सर्वाधिक जास्त जमीन आली आहे. सेमी पब्लिक झोनमध्ये आलेल्या जमिनीवर प्लॉटिंग पाडण्यात येत आहे. त्यासाठी सिडकोकडून, महसूल प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची माहिती घेतलेली नाही, अशी माहिती ग्रामस्थांकडून समजली आहे. 

झालर क्षेत्र विकास करणे सिडकोच्या ताकदीबाहेरसिडकोने विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून २८ गावांसाठी झालर क्षेत्र विकास आराखडा तयार केला. त्याला शासनाने मंजुरी देऊन अधिसूचना जारी केली. परंतु सध्या त्या गावांत नियोजनबद्ध विकास करण्यासाठी आरक्षणनिहाय काम करणे सिडकोच्या ताकदीबाहेर गेले आहे. मांडकीतील शेतकऱ्यांनी मुख्य प्रशासक मधुकर आर्दड यांची बुधवारी भेट घेऊन कैफीयत मांडली. सध्या सिडको झालरमध्ये अतिक्रमण होऊ नये, अनधिकृत प्लॉटिंग व बांधकामे होऊ नयेत, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्य प्रशासक आर्दड यांनी सांगितले. या सगळ्या प्रकारात ज्यांची जमीन आरक्षित झाली आहे, त्यांची गळचेपी होत आहे. सिडको भूसंपादन करण्यास समर्थ नाही, बाजारात आरक्षणामुळे जमीन विक्री होत नाही, अशा विवंचनेत शेतकरी अडकले असल्यामुळे सिडकोच्या विरोधात शेतकऱ्यांनी जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रा.पांडुरंग मांडकीकर, साईनाथ चौथे, नारायण गायके, निजामभाई शहा आदींनी ग्रामपंचायतीच्या ठरावासह सिडकोला निवेदन दिले. 

शिष्टमंडळाने केलेल्या मागण्या मांडकीच्या ग्रामस्थांनी मुख्यमंत्री व सिडको प्रशासकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मांडकी गाव झालर क्षेत्रातून वगळण्यात यावे. १२ वर्षांपासून सिडकोने काहीही सुविधा दिल्या नाहीत. झालर क्षेत्र नियोजनासाठी सिडकोचे भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर आहे. बांधकामे झालेली असताना जागा आरक्षित केल्या आहेत. धनदांडग्यांच्या जमिनी यलो तर गरिबांच्या जमिनी ग्रीन झोनमध्ये आरक्षित केल्या. सिडकोने झालर क्षेत्र विकासाबाबत न्यायालयात शपथपत्र दाखल करावे. 

झोन क्रमांक : ३पिसादेवी, गोपाळपूर, साजापूर, अंतापूर, मांडकी, दौलतपूर, मल्हारपूर, रामपूर, कच्चीघाटी, सुलतानपूर, फतेपूर, हिरापूरमध्ये अंदाजित ७१ हजार लोकसंख्येसाठी २३ शाळा, १३ हायस्कूल, ९ दवाखाने, ७ व्यापारी संकुल, ५ उद्याने, १० क्रीडांगणे, ११ वाचनालये, ४ टाऊन हॉल, १० स्मशानभूमींसाठी आरक्षण टाकले आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादcidcoसिडकोAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग