शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

औशात शेतकरी, शेतमजुरासह निराधारांचा महाआक्रोश मोर्चा

By संदीप शिंदे | Published: January 15, 2024 6:21 PM

सोयाबीनला ९ हजार भाव, १०० टक्के पिकविमा देण्याची मागणी

औसा : मराठवाड्यातील शेतकरी, शेतमजूर आणि निराधारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी औसा तहसील कार्यालयावर महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे वाटोळे केले आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत ऊसाला भाव का मिळत नाही, असा सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला. जोपर्यंत सोयाबीनला प्रतिक्विंटल ९ हजार भाव, १०० टक्के पिकविमा, निराधारांना ३ हजार मानधन मिळत नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

औसा तालुक्यात १५ दिवस १०० गावातून १५० कि.मी. पायीदिंडी काढून शेतकरी, शेतमजूर आणि निराधारांच्या मागण्याची जनजागृती करण्यात आली. किल्ला मैदान ते औसा तहसील कार्यालयापर्यंत महाआक्रोश मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले. यावेळी कांदा निर्यात बंदी उठवा, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान द्याओ, चालू बाकी करणाऱ्यांसाठी व्याजासह कर्जाची संपूर्ण रक्कम भरण्याची अट रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शेतकरी विरोधी धोरण राबविणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी शेतकरी नेते सत्तार पटेल, राजेंद्र मोरे, अरुण कुलकर्णी, राजू कसबे, शामभाऊ जाधव आदींसह शेतकरी, शेतमजूर, आणि निराधार उपस्थित होते.

१९ जानेवारीला रेल्वे अडवणार...आम्ही आमचा हक्क व अधिकार मागतोय, सोयाबीनचा एकरी ३५ हजार खर्च अन् उत्पन्न १५ हजार. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करीत आहे. सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याने सोयाबीनला ४५०० भाव मिळतो. १८ जानेवारीपर्यंत वरील मागण्या मान्य न झाल्यास १९ जानेवारीला मुंबई, गुजरातला रेल्वे जाणार नाहीत. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा जीवही गेला तरीही चालेल, पण शेतकरी, शेतमजूर, निराधारांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे रविकांत तुपकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र