लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशभरात गोरक्षकांकडून होत असलेले हल्ले थांबावेत या उद्देशाने मुस्लिम आरक्षणासाठी ऐतिहासिक मोर्चा काढणाºया ‘महाराष्टÑ अवामी मुस्लिम कमिटी, औरंगाबादतर्फे शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर महाधरणे आंदोलनाचे आयोजन केले होते. त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व उर्दू दैनिकांनी पान भरून या उपक्रमाचे कौतुक केले. त्यासोबतच मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षावर अत्यंत बोचरी टीका करण्यात आली आहे. या महाधरणे आंदोलनात एमआयएमचे पदाधिकारी तर सोडा कार्यकर्तेही गायब होते, अशी टीका ‘औरंगाबाद टाइम्स’ या दैनिकाने केली आहे.औरंगाबाद टाइम्सने महाधरणे आंदोलनाची मुख्य बातमी छायाचित्रासह प्रसिद्ध केली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रतापगढहून आलेले प्रसिद्ध शायर इम्रान प्रतापगढी यांच्या देशप्रेम आम्हाला कोणी शिकविण्याची गरज नाही...या विधानाला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले आहे. त्याचप्रमाणे मौलाना तौकीर रजा यांनी कार्यक्रमात नमूद केले होते की, मुसलमान खरोखरच मुसलमान बनला तर कोणीच त्यांच्यावर हल्ले करू शकणार नाही, या विधानालाही औरंगाबाद टाइम्सने ठळक प्रसिद्धी दिली आहे. मुस्लिमांच्या संयमाचा बांध फुटला तर या देशातील परिस्थिती आटोक्यात येणार नाही, असा इशाराही रजा यांनी दिल्याचे वर्तमानपत्रात नमूद आहे.राष्टÑवादीचे प्रवक्ता तथा प्रसिद्ध वक्ते प्रदीप सोळुंके यांनाही व्यापक प्रसिद्धी देण्यात आली आहे. प्रत्येक आतंकवादी मुस्लिम का...या प्रश्नाचे उत्तर देताना साळुंके यांनी नमूद केले की, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना मारणारे मुस्लिम होते का...असा प्रश्न उपस्थित केला. या विधानालाही प्रसिद्धी मिळाली.
महाधरणे आंदोलनातून एमआयएम गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 1:07 AM