औरंगाबाद : कपाशीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पादन दोन वर्षांपूर्वी चांगलेच घटले. यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत होता. स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या महाधन स्मार्टेकने पुरविलेल्या नवीन न्यूट्रिअंट अनलॉक तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळाली. महाधन स्मार्टेक १०:२६:२६ चा वापर केल्याने कपाशीच्या उत्पादनात १० टक्के वाढ झाली. या भागातील शेतकऱ्यांनी महाधनचा वापर केला नाही. त्यांना मी प्रोत्साहन देत आहे, असे फुलंब्री तालुक्यातील वानेगाव येथील शेतकरी प्रवीण एकनाथ जाधव यांनी सांगितले. भारतात ११.५ दशलक्ष हेक्टर तर महाराष्ट्रात ४ दशलक्ष हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कपाशीचे पीक घेतले जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केल्यानंतरही उत्पादन स्थिर आहे. लागवडीचा एकूण खर्चही वाढत आहे. मी पहिल्यांदाच महाधन स्मार्टेकचा वापर केला. त्यामुळे कपाशीला चांगली बोंडे आली. उत्पादन वाढले. माझ्या गावातील शेतकऱ्यांनाही आता त्याच्या परिणामकतेचे महत्त्व पटलेले आहे. त्यांनीही आता सध्याच्या हंगामात महाधन वापरण्यास सुरुवात केली आहे.
महाधन स्मार्टेकच्या न्यूट्रिअंट अनलॉकने कपाशीचे उत्पादन वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:09 AM