शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

आपले सरकार सेवा केंद्रांची सेवा देण्यास ‘महाआयटी’चा नकार

By विजय सरवदे | Published: September 25, 2024 7:24 PM

नवी संस्था नेमली : कर्मचाऱ्यांच्या चार महिन्यांच्या वेतनाचे काय?

छत्रपती संभाजीनगर : आपले सरकार सेवा केंद्र हा प्रकल्प राबविण्यासाठी नेमलेल्या आयटी क्षेत्रातील दोन कंपन्या अलीकडच्या तीन महिन्यांत बदलण्यात आल्या. आता शासनाने सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना सुविधा देण्यासाठी ‘रेलटेल कॉपोरेशन ऑफ इंडिया’ आणि आयटीआय लिमिटेड या संस्थांसोबत वर्षभरासाठी शासनाने करार केला आहे. मात्र, ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक व जिल्हास्तरावरील सॉफ्टवेअरचे व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चार महिन्यांपासून थकलेल्या वेतनाबाबत अनिश्चितता कायम आहे. ग्रामपंचायत स्तरावर संगणकीय प्रणालीद्वारे सर्व प्रकारचे दाखले, विविध योजनांच्या कामकाजासाठी सन २०१६ मध्ये ‘सीएससी - एसपीव्ही’ संस्थेसोबत शासनाने करार केला होता. ३१ मार्च २०२० रोजी १४ व्या वित्त आयोगाची मुदत संपल्यामुळे या संस्थेसोबतचा करार देखील संपुष्टात आला. त्यानंतर याच कंपनीला पुढे मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली होती. अलीकडे ३० जून २०२४ रोजी या कंपनीसोबत करार रद्द करण्यात आला.

दरम्यान, ‘महाआयटी’ या संस्थेसोबत करार करण्याची बोलणी सुरू होती; पण या संस्थेने नुकताच नकार दिल्यामुळे आता ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ सुरू ठेवण्यासाठी ‘रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ आणि आयटीआय लिमिटेड या केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमाची एका वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. शासनाने नवीन संस्था नेमल्या खऱ्या; पण संगणक परिचालक व जिल्हास्तरावर जिल्हा व्यवस्थापक आणि एक हार्डवेअर इंजिनिअर यांच्या सेवांबाबत निर्णय घेतला नाही. संगणक परिचालकांचे वेतन ग्रामपंचायतींनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करावे, असे शासनाचे निर्देश होते. ते आता ग्रामपंचायतींना नाकारले. त्यामुळे चार महिन्यांपासून जिल्ह्यातील ७०० संगणक परिचालक तसेच तालुका व जिल्हास्तरावरील कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा दर्जा हवासंगणक परिचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय वाघ यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे २९ हजार ग्रामपंचायतींमध्ये २० हजार संगणक परिचालक असून ते ७ कोटी जनतेला विविध प्रकारच्या ऑनलाइन व ऑफलाइन सेवा देतात. यामध्ये शेतकरी कर्जमाफी योजना, ग्रामीण घरकुल योजनेचा सर्व्हे, पीएम किसान योजना, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तसेच ३३ प्रकारचे दाखले देण्याचा समावेश आहे. त्यामुळे संघटनेची मागणी आहे की, संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा दर्जा आणि किमान वेतन देण्यात यावे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार