औरंगाबाद : औरंगाबादकरांसाठी १६ डिसेंबर हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. निमित्त असणार आहे ते लोकमत समूहातर्फे येत्या रविवारी विभागीय क्रीडा संकुलावर पहाटे ५.३0 वाजेपासून होणाऱ्या विंटोजिनो प्रस्तुत लोकमत औरंगाबाद महामॅरेथॉनचे. यादिवशी औरंगाबादेतील रस्ते युवा, युवती, ज्येष्ठ नागरिक, महिलांच्या उत्साहपूर्ण वातावरणात धावणाऱ्या धावपटूंनी ओसंडून वाहणार आहेत. महाराष्ट्रातील दिग्गज खेळाडूंसह परदेशी धावपटूंचा सहभाग आणि मराठवाड्याच्या राजधानीची परंपरा असणारे संस्मरणीय असे ठरणारे मेडल हेदेखील यंदा महामॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
पहिल्या दोन पर्वांमध्ये राज्य, देशभरातील आणि परदेशातील धावपटूंचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. आता तिसऱ्या पर्वातील महामॅरेथॉनचे साक्षीदार ठरण्यास ७ हजारांपेक्षा जास्त धावपटू आतुर झाले आहेत. त्यामुळे पूर्ण औरंगाबाद शहरच लोकमत महामॅरेथॉनमय झाले आहे.
येत्या रविवारी होणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. त्यामुळे ‘औरंगाबाद महामॅरेथॉन’ ही अनोखी आणि सहभागी नागरिक, खेळाडूंसाठी एक संस्मरणीय अनुभवाचा ठेवा ठरणार आहे. ही महामॅरेथॉन ‘न भूतो न भविष्यती’ अशीच होणार असल्याचा विश्वास धावपटूंकडून व्यक्त होत आहे.लोकमत समूहातर्फे आयोजित ही महामॅरेथॉन शहरवासीयांसाठी अनेक दृष्टीने मैलाचा दगड गाठणारी ठरणार आहे.
२१ कि.मी. अर्ध मॅरेथॉन, तर १० कि.मी. ही पॉवर रन असणार आहे. त्याचप्रमाणे फॅमिली व ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ कि.मी., फन रन गटासाठी ५ कि.मी. अंतर असणारी ही महामॅरेथॉन असणार आहे.आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, सर्व शहर महामॅरेथॉननिमित्त एकत्रित यावे, आपापसात जिव्हाळा निर्माण व्हावा, मैत्री वृद्धिंगत व्हावी व शहरात एकोपा वाढावा हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून लोकमत समूहाने या महामॅरेथॉनचे आयोजन केले आहे.
सहभागी खेळाडूंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, एनर्जी ड्रिंक, वैद्यकीय सुविधांसह चिअरअप करण्यासाठी खेळाडू, विविध खेळांचे संघटक व शहरातील नागरिक असणार आहेत. बिब, इलेक्ट्रॉनिक टायमिंग चिप आणि गुडी बॅग या बाबी फक्त २१ आणि १० कि.मी. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठीच देण्यात येणार आहे.
महामॅरेथॉनची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत फ्लॅग दाखवून केली जाणार आहे. महामॅरेथॉन संपल्यानंतर खेळाडूंसाठी सेल्फी झोनचीही व्यवस्था केली जाणार आहे. २१ कि.मी. व १० कि.मी.मधील फिनिशर्ससाठी मेडल्स व प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे लष्कर आणि पोलीस दलासाठीदेखील बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या महामॅरेथॉनमध्ये मस्ती, नृत्य, संगीत, अशा मनोरंजक कार्यक्रमांचीदेखील रेलचेल असणार आहे.
प्रमुख उपस्थिती : पहाटे ५.३० वाजता या महामॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. २१, १०, ५ व ३ कि.मी. अंतराच्या महामॅरेथॉनच्या उद्घाटनासाठी मान्यवर उपस्थित असतील. त्यात कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे, महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, जिल्हाधिकारी डॉ. उदय चौधरी, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, ब्रिगेडिअर एस. एस. मोहिते, कर्नल राजबीरसिंग शेरॉन (एनसीसी), कर्नल डी. के. राणा, कुलसचिव डॉ. साधना पांडे, उपायुक्त वर्षा ठाकूर, आरटीओचे सतीश सदामते, उपायुक्त पारस बोथरा, चिकलठाणा एअरपोर्ट डायरेक्टर डी.जी. साळवे, डॉ. स्वप्नील लाले (असिस्टंट डायरेक्टर, हेल्थ), घाटी रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांचा समावेश आहे.
असा असणार महामॅरेथॉनचा मार्ग :