शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

संजय शिरसाठांना सेनेचा 'एबी फॉर्म'; भाजपचे राजू शिंदे अद्यापही रणांगणात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 4:58 PM

मागील दोन दिवसांपासून शिंदे मुंबईत तळ ठोकून आहेत.

औरंगाबाद : पश्चिम विधानसभा मतदार संघात शिवसेनेने विद्यमान आमदार संजय शिरसाठ यांना उमेदवारी दिली असली तरी भाजपचे नगरसेवक राजू शिंदे निवडणूक रिंगणात कायम आहेत. मतदारसंघातील भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यासोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. मागील दोन दिवसांपासून शिंदे मुंबईत तळ ठोकून आहेत. 

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात भाजपकडून इच्छुक असलेले राजू शिंदे यांनी आपला दावा आधीच ठोकला आहे. दरम्यान, शिवसेनेकडून आमदार संजय शिरसाठ यांनाच औरंगाबाद पश्चिममधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना पक्षाने एबी फॉर्मसुद्धा दिला आहे. मात्र या मतदारसंघात प्रचाराची आघाडी घेतलेल्या भाजपच्या राजू शिंदे यांची अद्याप माघार घेतली नाही. आ. शिरसाठ यांच्या उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच शिंदे यांनी मतदारसंघात मोठे कार्यालय थाटून शासनाच्या योजना जनतेपर्यंत नेण्यास सुरुवात केली होती. तसेच औरंगाबाद पश्चिमची निवडणूक ही यंदा मतदारसंघातील न सुटलेल्या प्रश्नांवर होणार आहे. हीच बाब हेरून शिंदे यांनी या मतदारसंघात काम करायला सुरुवात केली आणि आ. शिरसाट यांच्यापुढे तेच प्रबळ उमेदवार असल्याचे वातावरण तयार करण्यात ते यशस्वी झाले. यामुळेच शिरसाठ यांची उमेदवारी जाहीर झालेलीं असतानी त्यांचे आव्हान अद्याप कायम आहे. मात्र पक्षाने त्यांना निवडणूक लढविण्यास संदर्भात ग्रीन सिग्नल दिला नाही.

२०१४ मध्ये भाजपा उमेदवार दुसऱ्या स्थानी २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही. त्यावेळी भाजपचे मधुकर सावंत यांनी आ. शिरसाट यांना जोरदार लढत दिली. सावंत यांची तयारी नसताना त्यांना पक्षाने तिकीट दिले आणि त्यांनी ५४ हजार ३५५ इतकी मते घेतली. आ. शिरसाट यांना त्यावेळी ६१ हजार २८२ मते मिळाली. या निवडणुकीच्या काही दिवसांनंतरच राजू शिंदे यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. 

काँग्रेसमध्ये काय?२०१४ मध्ये जितेंद्र देहाडे हे काँग्रेसचे उमेदवार तिसऱ्या स्थानी राहिले. त्यामुळे या मतदारसंघात वर्तमान परिस्थितीमध्ये काँग्रेसची ताकद कमी आहे. त्यामुळे ही जागा अन्य पक्षाला देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र, याबाबत निश्चित अशी माहिती समोर येत नाही. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमAurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाBJPभाजपा