शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

पहिल्या विधासभेत औरंगाबादचे आमदार हैदराबाद राज्यातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 11:43 AM

पहिल्याच निवडणुकीत गोविंदभाई श्रॉफ यांचा पराभव 

ठळक मुद्देमराठवाड्यातून काँग्रेसला २६ जागाजनसंघासह ९ पक्षांचे सर्वच उमेदवार पडले

- शांतीलाल गायकवाड 

औरंगाबाद : देश स्वतंत्र झाल्यानंतर फेबु्रवारी- मार्च १९५२ मध्ये प्रथम लोकसभा व विधानसभेच्या एकत्रच निवडणुका झाल्या. तेव्हा मराठवाडा हैदराबाद राज्यात होता. त्यामुळे मराठवाड्यातून विजयी झालेले ४४ आमदार हैदराबाद राज्याच्या स्टेट असेंब्लीचे सदस्य होते. हैदराबाद राज्याच्या विधानसभेतून १९५५ पर्यंत मराठवाड्याचा कारभार चालला. गोविंदभाई श्रॉफही मैदानात

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे जे योगदान आहे, तसेच हैदराबाद मुक्ती लढ्यात स्टेट काँग्रेसचे. परंतु स्टेट काँग्रेसच्या नेत्यांनी १९५२ ची निवडणूक प्रजा डेमोक्रॅटिक फ्रंट (पीडीएफ) स्थापन करून स्वतंत्रपणे लढली. औरंगाबाद शहर मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेसने (आयएनसी) श्रीपादराव लक्ष्मणराव नवासेकर यांना तर पीडीएफने गोविंदभाई श्रॉफ (गोविंददास मन्नुलाल श्रॉफ) यांना मैदानात उतरविले होते. गोविंदभाई हैदराबाद मुक्ती लढ्यातील आघाडीचे स्वातंत्र्यसेनानी व नावलौकिक प्राप्त तडफदार नेते होते. पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली नवासेकर यांनी गोविंदभार्इंचा ३ हजार ९९ मतांनी पराभव करून आश्चर्यकारक विजयाची नोंद केली होती. नवासेकर यांना ८ हजार ९६६ तर गोविंदभार्इंना ५ हजार ८६७ मते मिळाली. 

औरंगाबाद विधानसभा मतदारसंघात फक्त ५६ हजार ८८६ मतदारऔरंगाबाद विधानसभा मतदारसंघात तेव्हा फक्त ५६ हजार ८८६ मतदार होते. त्यापैकी केवळ २६.०७ टक्के अर्थात १४ हजार ८३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही सर्व मते वैध ठरली. 

औरंगाबाद जिल्ह्यात ११ मतदारसंघतेव्हा औरंगाबाद -जालना मिळून एकच औरंगाबाद जिल्हा होता व जिल्ह्यात कन्नड, फुलंब्री, सिल्लोड, औरंगाबाद, भोकरदन, जालना, अंबड, पैठण-गंगापूर व वैजापूर, असे ११ मतदारसंघ होते. भोकरदन  व पैठण-गंगापूर या मतदारसंघातून प्रत्येकी दोन (एक राखीव, एक सर्वसाधारण) उमेदवार निवडून दिले गेले. जिल्ह्यात ५ लाख ६९ हजार ४५७ मतदार होते. जेमतेम ४० टक्के मतदारांनी हक्क बजावला. 

जनसंघासह ९ पक्षांचे सर्वच उमेदवार पडले

या निवडणुकीत १५ पक्ष सहभागी झाले होते. त्यातील भारतीय जनसंघ, अखिल भारतीय हिंदू महासभा, किसान मजदूर प्रजा पार्टी, अखिल भारतीय रामराज्य पार्टी, आॅल इंडिया रिपब्लिकन पार्टीसह एकूण ९ पक्षांचा एकही उमेदवार या निवडणुकीत विजयी झाला नाही. काँग्रेस ९३, सोशालिस्ट पार्टी ११, पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट ४२, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ५, पीजंट अ‍ॅण्ड वर्कर्स पार्टी आॅफ इंडिया (पीडब्ल्यूपी) १० आणि १४ अपक्ष विधानसभेत पोहोचले. 

मराठवाड्यातून काँग्रेसला २६ जागापहिल्या निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. हैदराबाद राज्याची सत्ता काँग्रेसकडे आली. मराठवाड्यातील ४४ जागांपैकी २६ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. १० जागेवर पीडब्ल्यूपी, ६ जागा पीडीएफ आणि २ जागा शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने पटकावल्या. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा