शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

मराठवाड्यात तीन मंत्र्यांना धक्का; पंकजा मुंडे, खोतकर, जयदत्त क्षीरसागर पराभूत

By गजानन दिवाण | Published: October 25, 2019 7:13 PM

४६ मतदारसंघांपैकी १६ ठिकाणी विजय मिळवीत भाजप नंबर वन राहिला.

- गजानन दिवाण 

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत ग्रामविकास आणि महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे (परळी), रोहयोमंत्री जयदत्त क्षीरसागर  (बीड) आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर (जालना) या तीन मंत्र्यांचा पराभव धक्कादायक ठरला. 

४६ मतदारसंघांपैकी १६ ठिकाणी विजय मिळवीत भाजप नंबर वन राहिला. शिवसेना १२, काँग्रेस आठ, राष्ट्रवादी आठ आणि शेकाप, रासपने प्रत्येकी एक जागा मिळविली.  राज्याचे लक्ष लागलेल्या परळीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण-भावातील लढत लक्षवेधी ठरली. निवडणुकीच्या दोन दिवस आधी व्हायरल झालेल्या धनंजय यांच्या कथित व्हिडिओने खळबळ उडवून दिली. आरोप-प्रत्यारोप झाले. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून भाजपचे सर्वच ज्येष्ठ नेते परळी आपलीच असल्याचा दावा करीत असताना मतदारांनी त्यांचा अंदाज खोटा ठरविला.

राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करून सेनेत प्रवेश घेत मंत्रीपद मिळविणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांना बीडमध्ये त्यांचा  पुतण्या संदीप क्षीरसागर भारी पडला. तिकडे जालना मतदारसंघात गेल्यावेळी निसटता पराभव पत्कारावा लागलेले काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुत खोतकर यांचा पराभव केला. सलग चार वेळा राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला घनसावंगी मतदारसंघ राजेश टोपे यांनी शेवटपर्यंत झुंज देत कायम राखला. त्यांनी सेनेचे हिकमत उढाण यांचा पराभव केला. या जिल्ह्यात सेनेला एकही जागा मिळाली नाही. 

नांदेडमध्ये भाजपच्या बंडखोरीबरोबरच अंतर्गत संघर्षही शिवसेनेला भोवला. त्यामुळे जिल्ह्यातील नऊपैकी अवघ्या एका जागेवर शिवसेनेला समाधान मानावे लागले. काँग्रेसचे चार, तर भाजपचे तीन उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. विरोधकांनी लक्ष केंद्रित केलेल्या भोकर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपला धोबीपछाड देत ९७ हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला. माजी मंत्री डी. पी. सावंत यांना नांदेड उत्तरमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. तेथे शिवसेनेचे बालाजी कल्याणकर विजयी झाले. 

उस्मानाबाद जिल्ह्यात पाण्याच्या मुद्यावर रण तापवत महायुतीने चारही जागा खेचून आणल्या. राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापुरातून विजय मिळविला.  हिंगोलीत भाजप, सेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाली. परभणीत भाजप, सेना, काँग्रेस आणि रासपने प्रत्येकी एक जागा मिळविली. गेल्यावेळी दोन आमदार असलेल्या राष्ट्रवादीला येथे यावेळी भोपळाही फोडता आला नाही. 

सख्खे भाऊ विधानसभेत : लातूर शहर आणि ग्रामीणमधून अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे दोन सख्खे भाऊ विजयी झाले. धीरज देशमुख यांनी येथे विक्रमी मताधिक्य मिळविले. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंग्यातून विजय मिळविला. येथे पुन्हा एकदा काकावर पुतण्याने मात केली आहे.

जेलमधून लढले आणि जिंकले : शेतकऱ्यांच्या फसवणूक कर्ज प्रकरणात जेलमध्ये असलेले उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून रासपकडून निवडणूक लढविली आणि त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा तब्बल १८ हजार ८९६ मतांनी पराभव केला. गेल्या चार महिन्यांपासून ते परभणीच्या कारागृहात आहेत. 

यंदा काय बदल झाला?- गेल्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्याने भाजपला १७ आमदार दिले. यावेळी यात एका अंकाची घसरण झाली. - गेल्या विधानसभेत शिवसेनेला १० आमदार देणाऱ्या मराठवाड्याने यावेळी आणखी दोन आमदारांची भर घातली. - मागच्या वेळी काँग्रेसचे नऊ आमदार होते. यावेळी ही संख्या एकने कमी झाली. औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबादेत पक्षाची स्थिती अतिशय वाईट राहिली.- राष्ट्रवादीची संख्या आठवरून सातवर पोहोचली. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MarathwadaमराठवाडाArjun Khotkarअर्जुन खोतकरPankaja Mundeपंकजा मुंडेJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर