- विकास राऊत छत्रपती संभाजीनगर - भाजप आणि महायुतीचे उमेदवार गृहनिर्माण मंत्री अतुल सावेऔरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहेत. २०१४ व २०१९ मध्ये या मतदारसंघातून विजय मिळविल्यानंतर यावेळच्या निवडणुकीत ते हॅट्ट्रिक साधतील की नाही, याकडे सर्वांचे लक्ष आहे. महायुतीच्या घटक पक्षांची मेहनत आणि मतदारसंघातील मत विभाजनावरच त्यांच्या हॅट्ट्रिकचा खेळ जमेल.
यावेळी मतदारसंघात २०१४ सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस, एमआयएम आणि भाजप अशी लढत होईल. शिवाय गेल्यावेळी सावे यांच्याविरुद्ध लढलेले एमआयएमचे गफ्फार कादरी यावेळी समाजवादी पक्षाकडून उभे आहेत. वंचित बहुजन आघाडीने मुस्लीम उमेदवार दिला आहे. त्यामुळे मुस्लिमांच्या मतांची विभागणी होणार असून त्याचा लाभ अतुल सावे यांना होणार आहे.
मतदारसंघात धार्मिक ध्रुवीकरण अटळ २०१४ पासून या मतदारसंघात जातीधर्माच्या आधारावर निवडणूक होत असल्याचे दिसते. २०१९ लाही धार्मिक ध्रुवीकरण झाल्याचे दिसले. आता २०२४ साली तिसऱ्या वेळी पुन्हा भाजप आणि एमआयएम हे आमने- सामने येत असल्याने यंदाच्या निवडणुकीतही जातीधर्माचा आधार घेतल्याचे चित्र दिसणार आहे.
लोकसभेत काय घडले? परिणाम काय? - मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार खा. संदिपान भुमरे हे विजयी झाले. एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील दुसऱ्या, तर उद्धवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. = औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून एमआयएमला ८९ हजार १४३ मते मिळाली होती. खा. भुमरे यांना ६३ हजार २२८, तर खैरे यांना ३८ हजार ३५० मते मिळाली होती.
निवडणुकीतील कळीचे मुद्देऔरंगाबाद पूर्व मतदारसंघ हा पूर्ण शहरी मतदारसंघ आहे. सिडकोच्या वसाहती मतदारसंघात आहेत. पाणीप्रश्न सर्वाधिक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मतदारसंघात झोपडपट्टी व स्लम वसाहती, गुंठेवारी भागात नागरी सुविधांचा अभाव आहे. अतिक्रमणे, वाढते गुन्हेगारी, बेरोजगारीचा कळीचा मुद्दा आहे.
२०१९ मध्ये काय घडले?अतुल सावे भाजप (विजयी) ९३,९६६ डॉ. गफ्फार कादरी एमआयएम ८०,०३६ कलीम छोटू कुरेशी समाजवादी पक्ष ५,५५५नोटा - १९५३
२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?वर्ष विजयी उमेदवार पक्ष मते टक्के २००९ राजेंद्र दर्डा काँग्रेस ४८,१९० ३९२०१४ अतुल सावे भाजप ६४,२२८ ३७२०१९ अतुल सावे भाजप ९३,९६६ ४८