Maharashtra Assembly Election 2024 :सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर) : मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना मालमत्तेची माहिती लपविल्याची तक्रार झाल्यानंतर निवडणूक आयोगाने ई-मेलद्वारे जिल्हाधिकारी व सिल्लोड निवडणूक अधिकारी यांना २४ तासांच्या आत अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रशासनामार्फत काय अहवाल दिला जातो, याकडे लक्ष लागले आहे. सत्तार यांनी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रातील त्रुटींबाबत सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली यांनी तक्रार दाखल केली आहे.
खटला दाखल करणारतक्रारदार शंकरपेल्ली यांनी सांगितले की, लवकरच सिल्लोड दिवाणी तथा फौजदारी न्यायालयात लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० मधील तरतुदी अनुसार फौजदारी खटला दाखल करण्यात येईल. तसेच, उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल.