औरंगाबाद : वडोदरा येथे सुरू असलेल्या २३ वर्षांखालील पश्चिम विभागीय वनडे क्रिकेट स्पर्धेत कर्णधार जय पांडे, प्रशांत कोरे आणि शमशुझमा काझी यांची अर्धशतके आणि त्यानंतर सिद्धेश वरघंटे याची सुरेख गोलंदाजी या बळावर महाराष्ट्राने सौराष्ट्र संघावर ६२ धावांनी दणदणीत विजय मिळवला.महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना ५0 षटकांत सर्वबाद २७५ धावा फटकावल्या. महाराष्ट्राकडून कर्णधार जय पांडे याने १११ चेंडूंत ४ चौकारांसह सर्वाधिक ७८ धावा केल्या. प्रशांत कोरेने ५९ चेंडूंत ५ चौकारांसह ५६ आणि अष्टपैलू शमशुझमा काझीने ३९ चेंडूंतच २ चौकार व २ षटकारांसह ५0 धावांची खेळी केली. सौराष्ट्रकडून चेतन सकारिया याने ५४ धावांत ४ गडी बाद केले. प्रत्युत्तरात सौराष्ट्रचा संघ ४५.५ षटकांत २१३ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून ए. कोठारियाने ५३ धावा केल्या. महाराष्ट्राकडून सिद्धेश वरघंटेने ४0 धावांत ४ गडी बाद केले.संक्षिप्त धावफलकमहाराष्ट्र : ५0 षटकांत सर्वबाद २७५.(जय पांडे ७८, प्रशांत कोरे ५६, शमशुझमा काझी ५0, अथर्व काळे २३. चेतन सकारिया ४/५४).सौराष्ट्र : ४५.५ षटकांत सर्वबाद २१३. (ए. कोठारिया ५३. सिद्धेश वरघंटे ४/४0, गौरव काळे २/५४, प्रणय सिंग २/२८).
महाराष्ट्राची सौराष्ट्र संघावर ६२ धावांनी मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 11:43 PM