औरंगाबाद : जिल्ह्यातील विधानसभा कुरुक्षेत्रात २०८ पैकी १३३ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांचा आता विजयाच्या दिशेने कूच करण्यासाठी कस लागणार आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी करून ज्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती, त्यापैकी अनेकांनी माघार घेतली. माघारीचा ‘मंडे’ बंडखोरांना थंड करण्यात यशस्वी झाला.
प्रचाराची खरी रणधुमाळी आता सुरू होईल. विधानसभेच्या कु रुक्षेत्रात उतरण्यासाठी ४ आॅक्टोबर रोजी २४७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्या अर्जांची ५ आॅक्टोबर रोजी छाननी झाली. त्यात ३९ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले. २०८ उमेदवार रिंगणात राहिले होते. ७ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जिल्ह्यातून तब्बल ७५ उमेदवारांनी माघार घेतल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी कळविले. १३३ उमदेवार रिंगणात असून, सर्वाधिक ३४ उमेदवार पूर्व मतदारसंघात आहेत. त्याखालोखाल वैजापूरमध्ये १६ उमेदवार आहेत. पैठणमध्ये १५, तर गंगापूरमध्ये १४ उमेदवार आहेत. फुलंब्रीत १३ उमेदवार आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात १२, औरंगाबाद मध्य मतदारसंघात १४, कन्नड मतदारसंघात ८, तर सर्वात कमी ७ उमेदवार सिल्लोड मतदारसंघात आहेत.
सिल्लोडमध्ये सर्वात कमी; पूर्वमध्ये सर्वाधिकसिल्लोडमध्ये सर्वात कमी ७ उमेदवार रिंगणात आहेत, तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघात सर्वाधिक जास्त ३४ उमेदवार आहेत. पूर्व मतदारसंघात एकूण ४७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातील १३ उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी पक्ष उमेदवारांना यश आले. सर्वाधिक उमेदवार गंगापूर मतदारसंघातून बाहेर पडले. २९ पैकी १५ उमेदवारांनी सोमवारी माघार घेतली. औरंगाबाद मध्य मतदारसंघातूनही ९ उमेदवारांनी माघार घेतली. सिल्लोड मतदारसंघातून १३ उमेदवार निवडणुकीच्या मैदानातून बाहेर पडले.
दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील उमेदवारमतदारसंघ उमेदवारांची संख्या माघार घेतलेले उमेदवारसिल्लोड ७ १३कन्नड ८ ६फुलंब्री १३ ७औरंगाबाद मध्य १४ ९औरंगाबाद पश्चिम १२ १औरंगाबाद पूर्व ३४ १३पैठण १५ ४गंगापूर १४ १५वैजापूर १६ ७एकूण १३३ ७५