शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

Maharashtra Election 2019 : भाजपने बंडाचे निशाण फडकावून शिवसेनेला डिवचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 12:16 PM

शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघात भाजपाचे बंडाचे निशाण

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडून कारवाईचा इशारा बंडखोरीचे अस्त्र भाजपच्या गोटातून

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची युती झाल्यामुळे मतदारसंघांचे वाटप युती करारानुसार झाले; परंतु याचे पडसाद बंडखोरीच्या रूपाने सर्वत्र उमटले असून, जिल्ह्यात शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघात बंडाचे निशाण फडकावून भाजपने डिवचले आहे. 

शिवसेनेनेही भाजपविरोधात बंडखोरी केली आहे. एक-दोन मतदारसंघ वगळता सेना- भाजपमधील इच्छुकांनी शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. युतीच्या विरोधात जाणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे बंडोबा थंड होतील की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला औरंगाबाद मध्य आणि पश्चिम हे मतदारसंघ आले आहेत. ग्रामीणमधील पैठण, वैजापूर, कन्नड, सिल्लोड हे मतदारसंघ आहेत. भाजपच्या वाट्याला फुलंब्री, औरंगाबाद पूर्व आणि गंगापूर हे मतदारसंघ आले आहेत. 

शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीचे चित्र पाहिले, तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघात भाजप उमेदवाराविरोधात शिवसेनेच्या उमदेवाराने अपक्ष अर्ज दाखल केला. पश्चिम मतदारसंघात शिवसेना उमेदवाराच्या विरोधात भाजपच्या इच्छुक उमेदवाराने अपक्ष अर्ज भरला. मध्य मतदारसंघात शिवसेना उमेदवाराच्या विरोधात भाजप उमेदवाराने अर्ज भरला. 

ग्रामीण भागातील मतदारसंघात पैठण आणि सिल्लोडमध्ये शिवसेना उमेदवाराची गोची झाली आहे. कारण पैठणमध्ये भाजपच्या इच्छुकाने राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे, तर सिल्लोडमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला भाजपने भूमिगत साथ दिल्याचे बोलले जात आहे. वैजापूरमध्ये भाजपने शिवसेना उमेदवाराविरोधात उमेदवारी अर्ज भरला आहे, तर कन्नडमध्येदेखील भाजप उमेदवाराने शिवसेना उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेना