Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पश्चिममधील उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने कॉंग्रेसला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 05:22 PM2019-10-05T17:22:54+5:302019-10-05T17:25:47+5:30

रमेश गायकवाड यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज बाद 

Maharashtra Election 2019 : Congress in shock due to nomination cancelled in Aurangabad West | Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पश्चिममधील उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने कॉंग्रेसला धक्का

Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पश्चिममधील उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने कॉंग्रेसला धक्का

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार रमेश गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज शनिवारी छाननीमध्ये बाद ठरला. या प्रकरणी गायकवाड यांनी न्यायालयात धाव घेतल्याची माहिती आहे.

रमेश गायकवाड यांनी अपक्ष आणि कॉंग्रेस असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांचे दोन्ही अर्ज बाद झाल्याची माहिती आहे. रमेश गायकवाड हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया -डेमोक्रॅटिक गटाचे उमेदवार आहेत. कॉंग्रेसने औरंगाबाद पश्चिमची जागा या मित्र पक्षाला सोडली होती. 

गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज बाद होणे कॉंग्रेसला मोठा धक्का मानले जात आहे. दरम्यान, रमेश गायकवाड यांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. औरंगाबाद मध्यची जागा राष्ट्रवादी लढत आहे तर औरंगाबाद पूर्वची जागा समाजवादी पक्ष लढत आहे यामुळे शहरात उमेदवारच नसल्याची वेळ कॉंग्रेसवर आली आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 : Congress in shock due to nomination cancelled in Aurangabad West

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.