शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

Maharashtra Election 2019  : सेनेतील नाराज म्हणतात, साहेब आमचे काय चुकले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 12:58 PM

सोशल मीडियातून व्यक्त होतायेत भावना 

ठळक मुद्देउमेदवारी द्यायचीच नव्हती, तर उठाठेव केली कशासाठीनिष्ठावान बंडखोरीच्या तयारीत

औरंगाबाद : 

साहेब, आमचे काय चुकले ...साडेतीन दशकांपासून निष्ठा ठेवलीशेवटची संधी हवी होती...डावलले, साहेब माझे काय चुकले...शिवसेनेने निष्ठावान पदाधिकाऱ्यांना डावलल्यामुळे सोशल मीडियातून त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. उमेदवारी द्यायचीच नव्हती, तर मुलाखतींचा अट्टहास केलाच कशासाठी. तुमचं ठरलं होतं तर मग आम्हाला एवढी धावपळ करून खर्चात कशासाठी घातले. पक्षात ये-जा करणाऱ्यांचीच तुम्हाला भलावण करायची होती, तर मग आमच्या मुलाखती घेऊन फक्त स्वबळाचा अंदाज घ्यायचा होता काय? यासारखे अनेक प्रश्न सोशल मीडियातून उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसैनिक उपस्थित करू लागले आहेत. 

उमेदवारी एकालाच मिळणार असते हे मान्य आहे. परंतु वारंवार तेच ते चेहरे समोर ठेवून पक्ष उमेदवारीचा निर्णय घेत असेल तर आमच्यासारख्यांनी घरचे खाऊन, काय फक्त घोषणा द्यायच्या का? यावर्षी नव्हे तर पुढच्या वेळी संधी मिळेल, अशी अपेक्षा ठेवून शिवसेनेचा झेंडा घेणारे अनेक जण कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक घडीतून बाद झाले आहेत. पक्षाने आजवर एकही लाभाचे पद देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचारदेखील केला नाही. त्यामुळे अनेकांचा अपेक्षाभंग झाला आहे. इतर पक्षांतील काही जण आयात करून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत पदे दिली, ते आयाराम आता विधानसभेत उमेदवारी न मिळाल्यामुळे दुसऱ्या पक्षात जाऊन बसले आहेत. निष्ठावानांना डावलून आयारामांची मनसबदारी का केली जाते, असा प्रश्न तमाम शिवसैनिकांना पडला आहे. 

निष्ठावान बंडखोरीच्या तयारीतमध्य मतदारसंघातून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. मागील अनेक वर्षे उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले काही शिवसेना पदाधिकारी बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. ३ किंवा ४ आॅक्टोबर रोजी ते उमेदवारी दाखल करू शकतात. तसेच पश्चिम मतदारसंघातूनही भाजपातील काही इच्छुक बंडखोरी करण्याच्या तयारीत असून, बुधवारी बंडखोरांनी बैठक घेतली. पश्चिममधून भाजपने बंडखोरी केल्यास पूर्वमधूनही शिवसेना बंडखोरी करू शकते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेनाaurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिम