शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
2
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
4
शत्रूला शोधून करणार खात्मा, रोबोटिक श्वान का आहे खास?
5
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
6
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
7
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
8
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
9
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
10
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर
11
BBA चं शिक्षण आणि व्यवसायाचं स्वप्न...; पैसे नव्हते म्हणून ६० लाखांची BMW घेऊन झाला फरार
12
छत्तीसगडच्या सुकमात भीषण चकमक; 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, ओख-47 सह अनेक शस्त्रे जप्त
13
अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक
14
WhatsApp चं अप्रतिम फीचर! आता व्हॉईस नोट्स टेक्स्टमध्ये बदलता येणार; जाणून घ्या, कसं?
15
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
16
IPL 2025 कधीपासून सुरु होणार? BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा करून टाकल्या जाहीर
17
Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट
18
निकालांआधीच मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू; महायुती, मविआमधील या  नेत्यांची नावं चर्चेत
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
20
Vikrant Massey : "ते टीव्ही स्टार्सला कमी लेखतात"; विक्रांत मेस्सीने इंडस्ट्रीतील मोठ्या स्टार्सची केली पोलखोल

Maharashtra Election 2019 : मतदार ओळखपत्र हरवले आहे ?'टेंशन' नाही, 'ही' ११ कागदपत्रे ठरतील ओळखीचा पुरावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 3:58 PM

Maharashtra Election 2019: खालील कागदपत्रे दाखवून करा मतदानखालील कागदपत्रे दाखवून करा मतदान

औरंगाबाद : मतदानासाठी मतदान केंद्रावर गेल्यावर सगळ्यात अगोदर मतदारांचे छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र मागितले जाते. पण काही कारणामुळे जर मतदार ओळखपत्र उपलब्ध नसेल तर केवळ एवढ्याच कारणासाठी मतदान करणे टाळू नका. कारण जे मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त खालील ११ कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहेत. 

भारत निवडणूक आयोगाद्वारे यापूर्वी छायाचित्रासह मतदार चिठ्ठी (फोटो व्होटर्स स्लिप) मतदाराची ओळख कागदपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येत होते. मतदार ओळखपत्राचे वाटप सर्वदूर न झाल्यामुळे त्याऐवजी ही चिठ्ठी वापरली जात होती. परंतु आता मतदारांना मोठ्या प्रमाणावर छायाचित्रांसह मतदार ओळखपत्र वाटप करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता मतदार चिठ्ठी मतदाराचे ओळख कागदपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही. प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट सोबत आणणे आवश्यक आहे.

मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे शक्य नसल्यास मतदारांनी या पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.

पुढील कागदपत्रांपैक्की एक दाखवून मतदान करता येऊ शकते :१.पासपोर्ट २.वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) ३. केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनी याठिकाणचे कर्मचारी असल्यास तेथील ओळखपत्र. ४बँक किंवा पोस्ट कार्यालयातून वितरित करण्यात आलेले छायाचित्र असलेले पासबुक. ५.पॅनकार्ड. ६. रजिस्ट्रार जनरल आॅफ इंडिया यांच्यातर्फे  नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित केलेले स्मार्ट कार्ड. ७. मनरेगांतर्गत निर्गमित जॉब कार्ड. ८. भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत निर्गमित हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड. ९. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र. १०. खासदार, आमदारांचे अधिकृत ओळखपत्र. ११. आधारकार्ड. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Maharashtraमहाराष्ट्रElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग