औरंगाबाद : जबरदस्त फार्मात असणारा बीडचा शैलीदार फलंदाज सचिन धस याच्या आणखी एका सुरेख खेळीच्या बळावर महाराष्ट्राने शनिवारी १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत मुंबईविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ८ बाद २३० धावा फटकावल्या.मुंबईच्या बीकेसी मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या लढतीत महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करली. महाराष्ट्राची सुरुवात चांगली झाली नाही आणि साहील कड (२०) आणि अभिनंदन गायकवाड (१२) हे दोघे ४८ धावांत तंबूत परतले. त्यानंतर बडोदा संघाविरुद्ध २२८ धावांची नेत्रदीपक खेळी करणाऱ्या सचिन धस याने महाराष्ट्राच्या धावसंख्येला आकार दिला. त्याने अर्सिन कुलकर्णी याच्या साथीने तिसºया गड्यासाठी ६९ आणि सौरभ कुंभार याला साथीला घेताना पाचव्या गड्यासाठी ५१ धावांची भागीदारी केली. महाराष्ट्राकडून सचिन धस याने सर्वाधिक १५७ चेंडूंत १४ चौकारांसह ८४ धावांची सुरेख खेळी केली. त्याला साथ देणाºया सौरभ कुंभारने ८८ चेंडूंत ७ चौकारांसह ४६ आणि अर्सिन कुलकर्णी याने १५४ चेंडूंत ६ चौकारांसह ४५ धावांची खेळी केली. मुंबईकडून वरद वझे, झेनिथ सचदेवा व अनुराग सिंग यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.संक्षिप्त धावफलकमहाराष्ट्र : पहिला डाव : ९६.१ षटकांत ८ बाद २३०. (सचिन धस ८४, सौरभ कुंभार ४६, अर्सिन कुलकर्णी ४५, साहील कड २०. वरद वझे २/४१, अनुराग सिंग २/४१, झेनिथ सचदेवा २/३४).
मुंबईविरुद्ध महाराष्ट्राच्या ८ बाद २३० धावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 12:21 AM
जबरदस्त फार्मात असणारा बीडचा शैलीदार फलंदाज सचिन धस याच्या आणखी एका सुरेख खेळीच्या बळावर महाराष्ट्राने शनिवारी १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत मुंबईविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ८ बाद २३० धावा फटकावल्या. मुंबईच्या बीकेसी मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या लढतीत महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करली.
ठळक मुद्देपश्चिम विभागीय स्पर्धा : बीडचा सचिन धस चमकला