छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव सांगता समारंभाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक शहरात होत आहे. या बैठकीची जोरदार तयारी करण्यात आली असून, निवास, भोजन, स्वागतासाठी सगळी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
मराठवाड्यात आतापर्यंत झालेल्या मंत्रिमंडळाची परंपरा शिंदे सरकार मोडीत काढणार आहे. आजवर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांचा मुक्काम सुभेदारी विश्रामगृहातच राहिलेला आहे. मात्र, यावेळी सुभेदारीऐवजी पंचतारांकित हॉटेलमधील सूटमध्ये मुख्यमंत्री व मंत्री राहणार आहेत. विलासराव देशमुख यांनी २००८ साली, तर देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ साली विश्रामगृहातच मुक्काम केला होता.
कुठे केले आहे बुकिंग?३० रूम बुक - रामा हॉटेल - मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्री ७० रूम बुक - अमरप्रीत हॉटेल - उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी४० रूम बुक - ताज हॉटेल - सर्व सचिव४० रूम बुक - अजंता अम्बेसेडर - उपसचिव, अधिकारी ३०० वाहनांचा ताफा मंत्रिमंडळ बैठकीसाठी ३०० चारचाकी असतील. १० लाख रुपये वाहनावर खर्च होतील, तर मंत्री, सचिव व इतर अधिकारी वर्गासाठी एक दिवसाच्या दोन वेळच्या जेवणावर २० लाख रुपये खर्च होतील.