औरंगाबाद : बडोदा येथे २० ते २४ जानेवारीदरम्यान होणाºया अखिल भारतीय डाक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ गुरुवारी औरंगाबाद येथून सायंकाळी रवाना झाला आहे. रवाना झालेल्या संघात औरंगाबादचा डावखुरा वेगवान गोलंदाज शीतल म्हस्के आणि बीडचा अष्टपैलू खेळाडू अमरसिंग ढाका यांचा समावेश आहे. कर्णधारपद अतुल ठाकूर भूषवणार आहे, तर उपकर्णधारपदाची जबाबदारी गुरुदत्त आळवे याच्यावर असणार आहे.विशेष म्हणजे एमसीएतर्फे आयोजित आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत बीडच्या अमरसिंग ढाका यांनी आपल्या अष्टपैलू खेळाने विशेष ठसा उमटवला आहे. तसेच गेल्या २० वर्षांपासून तो अखिल भारतीय डाक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत आहे.महाराष्ट्राचा संघ निवडण्यासाठी औरंगाबाद येथील गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर सिलेक्शन ट्रायल झाले होते. त्यात मुंबई, पुणे, नागपूर आदी परिक्षेत्रांतील ४५ खेळाडू सहभागी झाले होते. त्यापैकी १५ खेळाडूंचा संघ निवडण्यात आला.अखिल भारतीय डाक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणारा क्रिकेट संघ- अनुज ठाकूर (कर्णधार), गुरुदत्त आळवे (उपकर्णधार), अक्षय भगत (यष्टिरक्षक), उमेश रहान, मंगेश बोरकर, राहुल जाधव, विशाल गोरे, कैलास राऊत, शशांक खंडाळकर, अमरसिंग ढाका, सतीश उबाळे, रूपेश मिस्त्री, अमोल उजगिरे, शीतल म्हस्के, सी.एन. पाटील.हा संघ निवडण्यासाठी औरंगाबाद परिक्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल प्रणव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली डी.एस. पाटील, प्रादेशिक डाक क्रीडा मंडळ सचिव डी.एस. पाटील, टी.एफ. तडवी, पी.के. तिवरखेडे, एस.बी. मुत्याल, एस.एम. कोळी, सचिन टेहरे, प्रवीण झोंड, फारुख शेख आदींनी परिश्रम घेतले. हा संघ निवड प्रक्रियेसाठी दिनेश कुंटे व शेख हबीब यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
अखिल भारतीय डाक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:45 AM
बडोदा येथे २० ते २४ जानेवारीदरम्यान होणाºया अखिल भारतीय डाक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ गुरुवारी औरंगाबाद येथून सायंकाळी रवाना झाला आहे. रवाना झालेल्या संघात औरंगाबादचा डावखुरा वेगवान गोलंदाज शीतल म्हस्के आणि बीडचा अष्टपैलू खेळाडू अमरसिंग ढाका यांचा समावेश आहे. कर्णधारपद अतुल ठाकूर भूषवणार आहे, तर उपकर्णधारपदाची जबाबदारी गुरुदत्त आळवे याच्यावर असणार आहे.
ठळक मुद्देऔरंगाबादच्या शीतल म्हस्केचा समावेश : बीडचा अमरसिंग ढाकाही करणार प्रतिनिधित्व