औरंगाबाद : डावखुरा शैलीदार फलंदाज विजय झोल याची स्फोटक खेळी आणि गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राने बुधवारी वडोदरा येथे सुरू असलेल्या २३ वर्षांखालील पश्चिम विभागीय वन डे क्रिकेट स्पर्धेत बडोदा संघावर ७ गडी आणि तब्बल ९१ चेंडू राखून दणदणीत विजय मिळविला.बडोदा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करली; परंतु महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करताना प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना डोके वर काढू देण्याची उसंत मिळू न देता नियमित अंतराने त्यांना तंबूत पाठविले. या कामगिरीमुळे महाराष्ट्राने बडोदा संघाला ५० षटकांत ९ बाद १९८ या माफक धावसंख्येवर रोखले. बडोदा संघाला जेके सिंग (१०) व ए. ए. पठाण (४३) यांनी ४६ धावांची सलमी दिली; परंतु गौरव काळे याने जे. के. सिंगला त्रिफळाबाद करीत ही जोडी फोडली. त्यानंतर बडोद्याचे फलंदाज मोठी भागीदारी करू शकले नाहीत. बडोदा संघाकडून ए. ए. पठाण याने ४० चेंडूंत ९ चौकारांसह सर्वाधिक ४३ धावा केल्या. पी. ए. कुमारने ३४ धावा केल्या. महाराष्ट्राकडून गौरव काळे याने ३६ धावांत ३ गडी बाद केले. त्याला प्रणयसिंग याने २९ धावांत २ गडी बाद करीत साथ दिली. प्रदीप दाढे, सिद्धेश वरघंटे, जय पांडे व प्रशांत कोरे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.त्यानंतर प्रत्युत्तरात उतरलेल्या महाराष्ट्राला कर्णधार मुर्तुजा ट्रंकवाला व जय पांडे यांनी ६९ चेंडूंत ७६ धावांची सलामी देताना विजयाचा पाया मजबूत रचला; परंतु हे दोघे आणि प्रशांत कोरे हे तीन फलंदाज ११ धावांच्या अंतराने बाद झाल्याने महाराष्ट्राचा संघ थोडा अडचणीत सापडला; परंतु तिसºया क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या डावखुºया शैलीदार फलंदाज विजय झोल याने चौफेर टोलेबाजी करताना अथर्व काळे याच्या साथीने १७.३ षटकांतच ११५ धावांची भागीदारी करताना महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्राने विजयी लक्ष्य ३४.५ षटकांत ३ फलंदाज गमावून २०२ धावा करून पूर्ण केले. महाराष्ट्राकडून विजय झोलने सर्वाधिक ८६ चेंडूंतच १२ खणखणीत चौकारांसह ८३ धावांची सुरेख खेळी केली. कर्णधार मुर्तुजा ट्रंकवाला याने ३६ चेंडूंत ८ चौकार व एका षटकारासह ३६, अथर्व काळे याने ४० चेंडूंतच ३ चौकार व एका षटकारासह ३८ व जय पांडे याने ५ चौकारांसह २८ धावांचे योगदान दिले. बडोदा संघाकडून डी. एस. पाटील, के. आर. काकडे व जे. के. सिंग यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.संक्षिप्त धावफलकबडोदा : ५० षटकांत ९ बाद १९८.(ए. पठाण ४३, पी. एस. कोहली ३३, पी. ए. कुमार ३४. गौरव काळे ३/३६, प्रणय सिंग २/२९, प्रदीप दाढे १/३८, सिद्धेश वरघंटे १/३०, जय पांडे १/२४, प्रशांत कोरे १/१५).महाराष्ट्र : ३४.५ षटकांत ३ बाद २०२. (विजय झोल नाबाद ८३, मुर्तुजा ट्रंकवाला ४८, अथर्व काळे नाबाद ३८, जय पांडे २८. डी. एस. पाटील १/५६, के. आर. काकडे १/२६, जे. के. सिंग १/१२).
विजय झोलच्या स्फोटक खेळीने महाराष्ट्र विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:43 PM
डावखुरा शैलीदार फलंदाज विजय झोल याची स्फोटक खेळी आणि गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राने बुधवारी वडोदरा येथे सुरू असलेल्या २३ वर्षांखालील पश्चिम विभागीय वन डे क्रिकेट स्पर्धेत बडोदा संघावर ७ गडी आणि तब्बल ९१ चेंडू राखून दणदणीत विजय मिळविला.
ठळक मुद्दे२३ वर्षांखालील पश्चिम विभागीय वन डे क्रिकेट स्पर्धा : बडोदा संघावर दणदणीत मात